काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच जूनी पेन्शन योजना लागू करणार. ★ ब्रम्हपुरी च्या पेन्शन एल्गार मेळाव्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन.

काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर लगेच जूनी पेन्शन योजना लागू करणार.


★ ब्रम्हपुरी च्या पेन्शन एल्गार मेळाव्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे आश्वासन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक.


ब्रम्हपुरी : दिनांक,२४/१०/२३ संपूर्ण महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी कर्मचारी वर्ग रस्त्यावर उतरून सरकारला धारेवर धरत आलेला आहे. त्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना च्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात केले आहे.


या आंदोलनाला आता व्यापक स्वरूप प्राप्त झालेले असून कर्मचाऱ्यांनी कंत्राटी भरती प्रक्रियेच्या विरोधात,जिल्हा परिषद शाळा खाजगीकरण विरोधात,कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या विरोधात,तसेच दत्तक शाळा योजनेला विरोध केल्याने हे आंदोलन जनमानसाचे आंदोलन झाले आहे.  

        

उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या सरकारला वठणीवर आणण्यासाठी तसेच 'जो पेन्शन बहाल करेंगा,वही देश पे राज करेगा'या नाऱ्याला बुलंद करण्यासाठी वरील विषय घेऊन वोट फॉर ओ.पि.एस. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना तालुका शाखा ब्रम्हपुरी च्या वतीने नुकताच राजीव गांधी सभागृह ब्रम्हपुरी येथे 'पेन्शन एल्गार मेळावा' आयोजित करण्यात आलेला आहे असे प्रस्तविकेतून तालुका महिला आघाडी अध्यक्षा डॉ.स्निग्धा कांबळे यांनी सांगीतले.त्यानंतर महिला कर्मचारी यांच्या वतीने उपस्थीत अध्यक्ष,उद्घाटक,प्रमुख पाहुणे,राज्य व जिल्हा पदाधिकारी यांना राखी बांधून महिला कर्मचारी यांनी जूनी पेन्शनची ओवाळणी मागितली. 


त्यानंतर झालेल्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या भाषणात जूनी पेन्शन ची ओवाळणी काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही महिला कर्मचारी यांना देऊ अश्याप्रकारचे ओवाळणी स्वरूप अभिवचन त्यांनी उपस्थित  जनसमुदायाला दिले.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जुन्या पेन्शन चा मुद्दा अग्रक्रमाने घेतला आहे असे सांगत यावेळी त्यांनी खाजगीकरणाला खतपाणी घालणाऱ्या सरकारवर टीकास्त्र सोडले व कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीचा जी.आर.कश्याप्रकारे रद्द केला याबद्दल सांगितले.

        

पेन्शन एल्गार  मेळाव्याचे उद्घाटन शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.त्यांनी मी विधिमंडळात लढण्यासाठी सदैव पेन्शन संघटना सोबत आहे असे सांगितले.पेन्शन संघटनचे राज्य सल्लागार सुनील दुधे यांनी वोट फॉर ओ.पी.एस. कश्याप्रकारे राबवायचे आहे याची माहिती दिली. राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी आपली संघटना कोणत्याही पक्षाची बांधील नाही.


आमच्या भूमिका स्वतंत्र असून पेन्शन मिळवण्यासाठी जे जे प्रयत्न करता येईल ते ते करू असा एल्गार केला.यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या राज्य कार्यकारणीचा सत्कार तालुक्याच्या वतीने करण्यात आला.यावेळी मंचावर राज्य महिला उपाध्यक्ष मनीषा मडावी,विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे,विभागीय सचिव हेमंत पारधी, विभागीय उपाध्यक्ष दुषांत निमकर,खाजगी विभागीय अध्यक्ष प्रदीप राठोड,विपिन धाबेकर जिल्हाध्यक्ष चंद्रपूर जिल्हा सचिव लखन साखरे,माजी जिल्हा सचिव निलेश कुमरे,पौर्णिमा तागडे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष गुरुदेव नवघडे,राज्य प्रतिनिधि चंद्रपूर मनीष वैरागडे,राकेश शेंडे,गुलाब लाडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.


सदर एल्गार मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग उपस्थित होते.या कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष सतिश डांगे यांनी केले तर आभार तालुका कोशाध्यक्ष अनंता ढोरे यांनी केले.या कार्यक्रमासाठी तालुका उपाध्यक्ष बालाजी दमकोंडावार,सचिव प्रशांत घुटके,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मंगेश नंदेश्वर,तालुका कार्याध्यक्ष प्रशांत मत्ते,धनराज राऊत,भाऊराव आठोळे,राजेश धोंगडे,अमोल लांजेवार,हौस्पाल शेंडे,सुशांत कंदिकुरवार,दिनेश मेश्राम,किशोर वानखेडे,मनीष वैरागडे,महेश कुमरे,श्रीमती विद्या फुंड यांनी विशेष सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !