राजुरा येथे ' झाला नाही संत असा ' विषयावर व्याख्यान संपन्न ; श्री, गुरुदेव सक्रिय प्रचारक तथा ज्येष्ठ सेवकांचा भावपूर्ण सत्कार.
एस.के.24 तास
राजुरा : श्री गुरुदेव सेवा मंडळ सहकारनगर रामपूरचे वतीने ज्येष्ठ उपासक अनिल चौधरी यांनी आपल्या मातृपितृच्या स्मृतिप्रीत्यर्थ संत गजानन महाराज मंदिर परिसरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी 'झाला नाही संत असा' या विषयावरील व्याख्यानाचे पुष्प गुंफले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय प्रचार समितीचे सदस्य ॲड.राजेंद्र जेनेकर,नशाबंदी मंडळाचे संघटक संदीप कटकुरवार,अभय घटे, ह.भ.प.आवारी आदींची उपस्थिती होती .
अध्यक्षस्थानी डॉ.जगदीश शिंदे होते.ग्रामगीताकार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दुर्लक्षित, उपेक्षित, श्रमिक जनांचे वास्तववादी साहित्य निर्माण करून त्यांच्या उत्थानासाठीही विचार दिला.ते १९४२ च्या चिमूर क्रांतीचे सेनानी होते तसे निजामशाहीच्या रझाकारांचे राज्य उलथून टाकण्यासाठीही गावोगावी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.एकंदरीत राष्ट्रसंतानी वैश्विक मानवतेचे मुल्यदर्शन आपल्या साहित्यातून प्रभावीपणे घडविले असे ते म्हणाले.
श्री गुरुदेव श्रमश्री पुरस्काराचे मानकरी अनिल चौधरी यांच्या षष्ठी निमित्ताने सक्रिय श्रीगुरुदेव प्रचारकांचा सत्कार,वयोवृध्द महिलांचा सन्मान,ध्यानप्रार्थनेवर रामप्रसाद बुटले यांचे मार्गदर्शन, परशुराम साळवे यांचे ग्रामगीता वाचन आदी कार्यक्रम घेण्यात आले. आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात उतार वयात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी व उपचार यावर वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा गेडाम ( कढोली) यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ.पल्लवी सानप,सतीश कौरासे,सुनीता कुंभारे यांची उपस्थिती होती ,कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन बोढे होते.सुत्रसंचालन देविदास वांढरे यांनी केले.व्याख्यान मालेतील पाहुण्यांचा परिचय व मानपत्र वाचन सौ.अश्विनी वांढरे हिने केले. सूत्रसंचालन प्रकाश उरकुंडे तर अनिल चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.
सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर बाळा गोहोकर यांनी मार्गदर्शन केले.षष्ठी निमित्ताने श्री गुरुदेव सेवक अनिल चौधरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला,सत्कार सोहळ्याच्या आयोजनात सौ.अरुणा चौधरी,रोहन चौधरी,अंकिता चौधरी व श्रीगुरुदेव सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रवंदना गायनाने समारोप झाला.