अ-हेरनवरगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हेशाखेची धाड.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१५/१०/२३ ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथे मागील कित्येक दिवसांपासून 52 पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार दि.15 ऑक्टोबर ला सदर ठिकाणी गुन्हेशाखेच्या पथकाने धाड टाकली असता काही व्यक्ती जुगार खेळतांना आढळून आले.त्यातील नामे 1) शानु शेख अब्दुल वाहब वय,37 रा.ब्रम्हपुरी व 2) अशोक सुखदेव ढोरे वय,43 वर्षं ढोरे वय,43 रा.अर्हेरनवरगाव या दोन आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश मिळाले असून त्यांचेकडून 2300/-रुपये हस्तगत करण्यात आले.
मात्र इतर काही व्यक्ती पसार झाले असल्याने अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तीची कसून चौकशी केली असता त्यांनी 1)नंदू भाणारकर रा.ब्रम्हपुरी 2)नितीन जराते रा.अर्हेरनवरगाव 3)धम्मादीप कऱ्हाडे रा.अर्हेरनवरगाव या तीन व्यक्तींची नावे सांगितली आहेत.
सदर तिन्ही व्यक्तींचा शोध सुरू असून वरील पाचही आरोपींवर जुगार कायदा 2012 अंतर्गत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हेशाखा चंद्रपूर चे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने केली.