ने.हि.महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.विनोद घोडमारे चे निधन.

ने.हि.महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.विनोद घोडमारे चे निधन.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,०७/१०/२३ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा विनोद घोडमारे यांचे वयाच्या ४४ व्या वर्षी दीर्घ आजाराने नागपूरला शुक्रवारी रात्रो १२.०० वाजता निधन झाले.


ते गेल्या आठ दिवसांपासून नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.प्रा.विनोद घोडमारे हे महाविद्यालयात २०१६ ला ग्रंथपाल पदावर रुजू झाले होते.उणीपुरी सात वर्षाची त्यांची नोकरी  झाली होती.


अतिशय मनमिळाऊ व नम्र,शांत स्वभावाचे ग्रंथपाल अगदी कमी वयात निर्वतले असल्याने सर्वत्र त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर भिसी जवळ त्यांच्या सावरला गावी शनिवारला अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी फार मोठा जनसमुदाय जमा झाला होता.त्यांच्यामागे आई,वडिल,भाऊ, पत्नी व दोन मुले आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !