प्रा.सुनील कामडे यांना " डॉक्टरेट " बहाल ; नवभारत क.महा.तर्फे सत्कार संपन्न.
एस.के.24 तास
मुल : स्थानिक नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र या विषयाचे प्रा.सुनील नारायण कामडे यांना नुकतीच गोंडवाना विद्यापिठाने प्रतिष्टेची " डाक्टरेट " ही पदवी बहाल केली आहे.
प्रा.सुनील कामडे यांनी" इन्फलूअन्स ऑफ सबस्टीट्युशन आन स्ट्रक्चरल मॅग्नेटीक इलेक्ट्रिकल्स प्रॉपर्टीस ऑफ स्ट्रॉंटियम नानोसाईझ हेक्सागोनल फेराईटस " या भौतिकशास्त्रीय विषयावर आपला शोधप्रबंध गोंडवाना विद्यापिठाला सादर केला होता.
या नाविण्यपूर्ण शोधप्रबंधाकरिता मार्गदर्शक म्हणून आंबेडकर महाविद्यालय नागपूर चे डॉ.किशोर रेतकर व राजीव गांधी अभियांत्रिकी महा.चंदपूर चे डॉ.पी.जी.अगोणी यांनी सहकार्य केले.
नवभारत कनिष्ट विज्ञान महाविद्यालयात डॉ.सुनील कामडी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. प्राचार्य,अशोक झाडे यांचे हस्ते शाल,श्रीफळ देवून व पेढे भरवून अभिनंदन करण्यात आले.यावेळी प्रा.महेश पानसे, प्रा.किसन वासाडे,प्रा.पुस्तोडे,प्रा.संजय येरोजवार, प्रा.प्रभाकर धोटे,प्रा.हरिष येलमूले,प्रा.विनोद बोलिवार,प्रा.कु.उगेमुगे,प्रा.सौ.वैरागडे व इतर शिक्षक सहकारी उपस्थीत होते.