ग्रा.पं.नवेगाव पांडव येथे २ आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

ग्रा.पं.नवेगाव पांडव येथे २ आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.         


एस.के.24 तास


नागभीड : नुकताच झालेला ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे २ आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी,माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधून अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांच्या कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळ स्वच्छता करून रायल पांम्प चे  झाडे  माजी उपसभापती विजय बोरकुटे उपसरपंच,रितेश जी पांडव सदस्य,दिवाकर जी नवघडे गुरूजी,पांडुरंगजी रामटेके,माजी मुख्याध्यापक बंशीलाल जी चुर्हे सर,श्रीमती शारदा ताई वासुदेवजी नवघडे,मालतीताई केवळ तिजारे सदस्य, मुख्याध्यापिका मेश्राम मेडम, मंदिरे मेडम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीमती पुष्पाताई मेश्राम, सरीताताई मेश्राम,आल्काताई फुकट आंगणवाडी सेविका मेडम आशाताईं मुरकुटे मदतनीस,आशावर्कर जयमालाताई पांडव यांच्या हस्ते लावण्यात आले.


 सर्व प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास मुख्यध्यापक नरेंद्र चुर्हे सर ने ही.विद्यालय यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर संयुक्तपणे राष्ट्रपिता महात्मा गांधी  व माजी प्रधान मंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.नंतर "'स्वच्छता ही सेवा, स्वच्छता शपथ" घेण्यात आली.१५ सप्टेंबर ते  १आक्टोबर पर्यंत २०२३ स्वच्छ भारत मिशन  विविध स्वच्छतेचे उपकरण राबविण्यात आले.आणी शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी, सर्व शिक्षक वृंद, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी खुप सहकार्य केले.


विशेष मोलाचे सहकार्य  नेवजाबाई हितकारीनी विद्यालय नवेगाव पांडव चे मुख्यध्यापक मान. नरेंद्र चुर्हे सर यांनी विद्यार्थ्यांना गावात स्वच्छता करायला प्रोत्साहित केले.  विद्यार्थांनी रांगोळी स्पर्धा चे माध्यमातून स्वच्छते पासून तर पर्यावरण पर्यंत खुप छान विचार  रांगोळी चे  माध्यमातून मोलाचे संदेश दिले.त्या निमित्ताने अँड.शर्मिला रतनकुमार रामटेके  यांच्या कडून प्रोत्साहन वाढविण्यासाठी पाहुण्यांचे हस्ते बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले ,ह्या कार्यक्रमांचे संचालन नवघडे म्याडम ने.ही.विध्यालय नवेगाव पांडव यांनी केले.


ने ही विद्यालयाचे शिक्षक मान.बुल्ले सर यांनी विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना महापुरुषांच्या विचार आत्मसात करुन नैतिकता पाडावी व शिक्षण घेऊन आपले व देशाचे भविष्य कसे उज्वल करावे असे मोलाचे मार्गदर्शन केले.


आभार अँड शर्मिला रतनकुमार रामटेके सरपंच ने.पा.यानी मुलांना उददेशुन महापुरुषांचे विचार आपल्या डोक्यात ठेऊन ,एक चांगला माणूस बना ,"शिकला तर हक्काची भाकर मिळेल तुम्हाला बाळा, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणे नव्हे." शिक्षका कडुन जेवढे ज्ञान घेता येते तेवढं घेत राहावे संगत चांगलेच लोकांची करावी.महापुरूषांसारखी किर्ती करावे.


नाही कि आजच्या लबाड नेत्यांन सारखें .उपस्थित शिक्षक नेहि विद्यालय निपाने सर,महाजन सर, मने मेडम, कुळे मेडम,फटाले सर,ग्रा.पं.कर्मचारी विजय नवघडे,अतुल पांडव,आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !