चिमुर तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यात विहीरगाव येथील गुराखी ठार.


चिमुर तालुक्यातील वाघाच्या हल्ल्यात विहीरगाव येथील गुराखी ठार.


एस.के.24 तास


चंद्रपूर : दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून एका गुराख्याला ठार केल्याची घटना आज चिमुर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रातर्गत बेलारा येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. मधुकर जंगलू धाडसे वय,वय.४९  असे मृतक गुराख्याचे नाव आहे.रा पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहिरगाव बेलारा पळसगाव या वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने या परिसरात सफारी साठी पर्यटकांची पाहुले वळत असतात.


चिमूर तालुक्यातील विहीरगाव जंगलात वसले आहे. येथील शेतकऱ्यांकडे पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर ते संसाराचा उदरनिर्वाह करतात.गाव जंगलात असल्याने वन्य प्राण्यांची भिती नेहमीच असते. खास करून वाघाची दहशत असल्याने गुराख्यांनी जनावरे जंगलात चरायला नेणे बंद केले आहे. त्यामुळे घरची जनावरे स्वतःलाच पाळी पाळी ने चरायला न्यावी लागत आहे. विहीरगावात सद्या प्रत्येक दिवशी सहा सहा शेतकऱ्यांची जनावरे चरायला नेण्यासाठी पाळी लावण्यात आली आहे.


आज रविवारी प्रफुल पाटील,सुरेश ढोणे, सुधाकर नन्नावरे, सहादेव रदये, सुभाष बावणे,मधुकर धाडसे आदी पशुपालकांनी सुमारे तिनशेच्या जवळपास पशुधन सकाळी १० वाजेदरम्यान चारण्यासाठी मन्सराम जीवतोडे यांच्या पडीत असलेल्या शेतात जनावरे घेवून गेले होते. जनावरे चरत असतानाही जनावरांना भक्ष बनविण्यासाठी वाघ परिसरात दबा धरून बसला होता. जनावरांच्या जवळ असलेला गुराखी गुराखी मधुकर धाडसे आदी याचेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.


जनावरांनी हल्ला होताच प्रचंड आरडाओरड सुरू केली. त्यामूळे अन्य गुरख्यानी धाडसे यांना आवाज दिला. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे त्याचा शोध घेतला असता काही अंतरावर नाल्याजवळ वाघाने फरफटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या.त्यापुढे शोध घेतला असता मृत्तदेह आढळून आला.शरीरावर ठीकठी वाघांच्या हल्ला केल्याच्या खुणा आढळून आल्या.


या त्यामुळे विहिरगाव शेतशिवरात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. सदर घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर त्यांचा ताफा घटनस्थळी पोहचला. वनविभागाने पंचनामा करून पमृत्तदेह ताब्यात घेवून उपजिल्हा रुग्णालया चिमूर पाठविला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !