अंबुजा सिमेंट फाउंडेशन चा उपक्रम विना महिला शेती अश्यक्य.

अंबुजा सिमेंट फाउंडेशन चा उपक्रम विना महिला शेती अश्यक्य.


एस.के.24 तास


कोरपना : भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीव्यवसायात विशेषतः शेतीला लागणारे साहित्य खरेदी असो त्यात पिकलेला मालाची विक्री असो अनेक निर्णय प्रक्रीयेत पूरूषांचा पुढाकार असताना दिसतो.जर कामाची तूलना केले तर शेतात महिलाच काम करताना दिसतात.वास्तविक पाहता निर्णय घेण्यामध्ये दोघांच समन्वय असल्याशिवाय शेतीत प्रगती अशक्य आहे.हे समजून अंबूजा सिमेंट फाऊंडेशनमार्फत राबविण्यात येत असलेल्या उत्तम कापुस प्रकल्प अंतर्गत मौजा सोनापूर येथे महीला शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले.


या प्रशिक्षणात अनेक बचत गटाच्या महीलानी बनवून वापरलेल्या दशपर्णी अर्क, जिवामृत,ट्रायकोडर्मा, निमअस्त्र, इत्यादी जैविक किटकनाशकाचे फायदे मतातून व्यक्त केले.महीला सिमीत उत्पन्नात सूद्धा कूटूंबाचे व्यवस्थित आर्थिक नियोजन करतात अंबूजा सिमेंट फाऊंडेशन महीला सक्षमीकरणासाठी चांगले उपक्रम राबवित असून महीलांनी शेतीव्यवसायात म्हणजेच निर्णय प्रक्रीयेत सूद्धा पूढाकार घेऊन आपल्या कूटूंबाचा विकास साधावा असे मत भेंडवीचे सरपंच श्री.शामरावजी कोटनाके यानी व्यक्त केले तसेच निमार्क दशपर्णी अर्क तयार करणाऱ्या महिला बचत गट यांना बक्षीस देऊन पुरस्कार देण्यात आले.


या कार्यक्रमाला सौ.ज्योती खंडारे.(महीलासक्षमीकरण) सूभद्रा वेडमे ग्रा.प.सदस्य,शिलाताई कोटनाके,लक्ष्मीबाई कोटोलू,उपस्थित होते.सदर कार्यक्रम दिपक साळवे बि.सि.समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  प्रक्षेत्र अधिकारी यांनी परिश्रम घेतले

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !