रोजगार भरती मेळावा २ नोव्हेंबर रोजी.

       

रोजगार भरती मेळावा २ नोव्हेंबर रोजी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : महिंद्रा अँड महिंद्रा या नामांकित कंपन्यांचे नागपूर आणि चंद्रपूर येथील वर्कशॉप साठी ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिशियन एन्ड इलेक्ट्रॉनिक्स,मोटर मेकॅनिक व डिझेल मेकॅनिक हे  ट्रेड उत्तीर्ण असलेल्या आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी विशेष रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.


एक्स -१४  अगस्ता मोटर्स,(वांढरी फाटा) एम‌आयडीसी,घुग्घुस रोड चंद्रपूर येथे दि. २/११/२०२३ रोजी सकाळी ११ ते ३ या दरम्यान करण्यात आलेले आहे.वरील दिलेल्या व्यवसायाच्या कामाचा उमेदवारांना किमान तीन ते पाच वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.


इच्छुक उमेदवारांनी याह मेळाव्याचा लाभ घ्यावा व मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांनी केलेले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !