माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्या विरोधात शेगाव पोलीस स्टेशनला तक्रार.
एस.के.24 तास
चिमुर : माजी सामाजिक न्याय मंत्री यांनी शिवाजी मोघे यांनी नागपूर येथील क्षेत्रबंधन मुक्ती दिनाच्या कार्यक्रमानिमित्ताने आदिवासी माना जमाती संदर्भात केलेल्या असंविधानिक वक्तव्याच्या विरोधात वरोरा तालुक्यातील गुंजाळा गावातील माना जमात बांधवांनी तक्रार दाखल केली. यावेळीगुंजाळा ग्रामपंचायतगुंजाळा ग्रामपंचायतचे सरपंच मधुकर चौधरी, विनायक चौधरी, देविदास जीवतोडे, नथूजी चौधरी, अनिल खाटे उपस्थित होते.
शिवाजी मोघे यांनी नागपूर येथील आदिवासी क्षेत्रबंधन मुक्तीदिनाच्या कार्यक्रमात “हमारी सरकार आयी तो हाय पॉवर कमिशन नेमो उसमे गलतीसे जो-जो जातीया आयी उसमे जो गलतीसे एन्ट्री आयी है उसमे माना भी है , ये माना भी गलत है, यह गोंडमाना उसके लिये है, सब माना के लिये नही है, यह गलत है इसको निकाल डालो....तुम कोर्ट में कितने भी झगडेंगे, गव्हर्मेट भी थक जाती और अपण वैयक्तिक भी थक जाते” अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. मुळात माना जमात प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून तिची स्वतंत्र सामाजिक व सांस्कृतिक परंपरा आहेत. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगाने माना जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले आहे.
मा.उच्च व मा.सर्वोच्च न्यायालयाने माना ही स्वतंत्र आदिवासी जमात असून कुठल्याही जमातीची उपजमात नाही असा न्यायनिर्णय दिला आहे. भारतीय संविधानानुसार कलम- ३४२ अन्वये महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातींच्या यादीत- १८ व्या क्रमांकावर स्वतंत्र आदिवासी माना जमातीची नोंद आहे. सर्व कायदेशीर न्यायनिर्णय मा. उच्च न्यायालय व मा.सर्वोच्च न्यायालयाने आदिवासी माना जमातीच्या बाजूने दिलेले आहे. पारंपारिक हक्क व अधिकाराने माना ही स्वतंत्र मूळ आदिवासी जमात आहे.
तरीही श्री.शिवाजीराव मोघे यांनी चुकीची माहिती पसरवून आदिवासी माना जमाती बद्दल इतरांमध्ये संभ्रम व द्वेषाची भावना निर्माण केली आहे. वरील वक्तव्याच्या माध्यमातून शिवाजी मोघे यांनी संविधान व मा.न्यायव्यवस्थेच्या निर्णया प्रती अनादर,अनास्था,अविश्वास असल्याचे दाखवून त्यांचा अपमान केला आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडे माना जमातीच्या विरोधातदस्तऐवज उपलब्ध असल्याच्याखोट्या फुशारक्या त्यांनी मारलेल्या आहे.
1980 पासूनच त्यांनी माना जमाती विरोधात वक्तव्य करणे सुरू केले होते. बेकायदेशीर वक्तव्य करणाऱ्या शिवाजी मोघेवर गुन्हा दाखल व्हावा, याकरिता शेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.