पोलीस भरती बोगस उमेदवार निवड प्रकरण ; आंदोलनाला धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचा पाठींबा.

पोलीस भरती बोगस उमेदवार निवड प्रकरण ; आंदोलनाला धनगर अधिकारी कर्मचारी संघटनेचा पाठींबा.


एस.के.24 तास


गडचिरोली : पोलीस शिपाई पद भरतीतील भटक्या जमाती क प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी व इतर मागण्यांना घेऊन अन्यायग्रस्त उमेदवारासह धनगर समाजातील तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले आहे. या आंदोलनाला पाठींबा दर्शवत धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यही आपल्या न्याय मागण्यासाठी आपली संघटना खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे.यासाठी समोर आम्हीही लढा उभारणार असल्याची ग्वाही दिली.

       जिल्हातील झाडे कुणबी 'कुणबी' हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक 15 वरील झाडे या पोटजातीचा नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत भटक्या जमाती क प्रवर्ग दाखवून खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी शासकीय नोकरी बळकावली जिल्ह्यातील पोलीस भरती तसेच राज्य राखीव पोलीस दलात खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे अनेक उमेदवारांची निवड झाली आहे. त्यामुळे खऱ्या भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेदवारावर अन्याय झाला असल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त उमेदवार तथा समाजातील तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण पुकारले आहे.


 दरम्यान उपोषण मंडपाला धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष अनिल कुमार ढोले,उपाध्यक्ष विलासराव डाखोळे महासचिव शरद उरकुडे,रामजी सोनाग्रे डॉ.विनोदजी बर्डे.जिल्हाध्यक्ष मारोती आरेवार,सचिव दीपक कोरिवार,कोषाध्यक्ष,वसंत मेडेवार,रेखा मेडेवार,शीला अलीवार,अक्षय पेद्दीवार,सुभाष मेडेवार,प्रभाकर नंदावार उपस्थित राहून उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !