आलापल्ली हत्याकांडाचा उलगडा ; नव्या प्रियकरा च्या मदतीने जुन्या प्रियकराला संपविले.
एस.के.24 तास
आल्लापल्ली : अवैध संबंधात अडसर ठरत असलेल्या जुन्या प्रियकराची नव्याच्या मदतीने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आलापल्ली येथे उघडकीस आली आहे.२९ ऑक्टोबररोजी अहेरी तालुक्यातील आलापल्ली शहरात गोंडमोहल्ला येथे तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. अहेरी पोलिसांनी तपासचक्रे गतीने फिरवून २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला.प्रेमाच्या त्रिकोणातून हे हत्याकांड घडल्याचे आता समोर आले आहे.
राकेश फुलचंद कन्नाके वय,३५ वर्ष रा.श्रमीकनगर, आलापल्ली असे मृत तरुणाचे नाव असून सचिन लक्ष्मण मिसाळ वय,३५ वर्ष.गोंड मोहल्ला, आलापल्ली व शालिनी म्हस्के वय,३२ वर्ष रा.गणेश मंदिर परिसर,आलापल्ली) या दोघांचा आरोपींत समावेश आहे.
राकेश व शालिनीमध्ये मागील नऊ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान राकेशचे लग्न झाले. मात्र,अधूनमधून तो शालिनीला भेटायचा. शालिनी देखील विवाहित आहे.दोन वर्षांपूर्वी सचिन ची शालिनि सोबत ओळख झाली.दोघात जवळीकता वाढली.मात्र राकेशला सचिन आणि शालिनीचे संबंध खटकू लागले.यातून तिघात वादही झाले होते. दरम्यान २८ ऑक्टोबर ला सचिन चे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते.हीच संधी साधून शालिनी त्याला भेटायला घरी आली होती.शालिनिवर पाळत ठेऊन असलेला राकेश देखील सचिनबच्या घरी पोहोचला. यावेळी तिघांमध्ये वाद झाले.
शालिनीने राकेशला धक्का दिल्याने तो सचिनच्या घरा समोरील नालीवर कोसळला.यावेळी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो बेशुद्ध पडला.परंतु सचिन लाकडी फळीने मारतच राहिला.दरम्यान राकेशचा मृत्यू झाल्याचे पाहून दोघांनी त्याचा मृतदेह चिखलात फेकला आणि घरी निघून गेले.दुसऱ्या दिवशी अंगावर जखमा असलेला राकेशचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती.पोलिसांनी २४ तासा तच या हत्याकांडाचा उलगडा केला.
पोलीस निरीक्षक,मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक बालाजी सोनुने, संतोष मरस्कोल्हे,हवालदार किशोर बांबोळे,अंमलदार,संजय चव्हाण यांनी आरोपींना जेरबंद केले.