केरोडा येथे कॅन्सर तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी घेतला लाभ.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
सावली : दिनांक 05 ऑक्टोंबर 2023 सावली तालुक्यातील मौजा.केरोडा येथे मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून विजयकिरण फाउंडेशन तर्फे फिरते कॅन्सर हॉस्पिटल शिबीर केरोडा या केंद्रावर केरोडा,जांब बुज,रय्यतवारी,कोंडेखल,गवारला गावासाठी कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबिराचे वरील गावासाठी आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला, पॉसिटीव्ह आलेल्या लोकांना डॉक्टरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर तपासणी हॉस्पिटल नागपूर येथे रेफर करण्यात आले.
रुग्ण सेवेचा ध्यास व जनसेवा हिच ईश्वर सेवा ह्याचे व्रत घेतलेले विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून फिरता कॅन्सर तपासणी हॉस्पिटल मुळे वेळीच कॅन्सर या रोगावर निदान होऊन अनेकांचे प्राण, वाचविले जाऊ शकतात. मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार हे गोर गरीब व सामान्य जनतेसाठी अहोरात्र झटणारे खरे लोकनेते आहेत असे प्रतिपादन मा.दिनेश पाटील चिटणुरवार, माजी बांधकाम सभापती,जि.पं, चंद्रपूर यांनी शिबिरा प्रसंगी केले.
या शिबिराला माजी बांधकाम सभापती,जि.पं मा.दिनेश पाटील चिटणुरवार,सामाजिक कार्यकर्ते मा.प्रशांत पाटील चिटणुरवार,केरोडा सरपंच, सौ.नर्मदा चलाख,उपसरपंच व गाव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.ओमप्रकाश ढोलने,कोंडेखल च्या सरपंच सौ.सरला कोटंगले,ग्रा.पंचायत केरोडा सदस्य मा.नितेश कावटवार,मा.नरेंद्र पिपरे,मा.मनोहर चलाख सेवा सोसायटी अध्यक्ष,व जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम तसेच काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हॉस्पिटल नागपूरचे कर्मचारी उपस्थित होते.