मुल तालुक्यातील टोलेवाही येथे महीला गळफास घेवुन केली आत्महत्या.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक,08/10/2023 रोज रविवार ला रात्रौ अंदाजे 9:30 वा.ते 10:00 वा. दरम्यान मृतक,सौ,निरंजना सुभाष माहाडोळे वय,33 वर्ष रा.टोलेवाही पो.भगवानपूर ता.मुल जिल्हा.चंद्रपूर
ही आपल्या घरी पती सोबत राहत होती.पती घरी आल्या नंतर त्यांना म्हणाली तुम्ही रोज दारू पिऊन कशाला येता म्हणाली त्याचं कारणाने पति व पत्नी यांच्यात शाब्दिक भांडण झाले.भांडण झाल्या नंतर पती हा खर्रा खाण्याकरिता पानठेला कडे निघून गेला.काही वेळाने घरी परत आल्यानंतर घरामध्ये प्रवेश करताच पत्नी गळफास घेऊन लटकलेल्या मृत अवस्थेत दिसली.त्या नंतर त्याने आरडाओरड केल्यावर शेजारी असलेल्या लोकांनी येऊन बघितले व लगेच चिरोली चौकीला जावून कळविले.
गावचे पोलीस पाटील,सौ,संगीता चल्लावार,व माजी सरपंच,संजय आवळे,केतन महाडोळे,संजय निकुरे,एस.के.24 तास चे उपसंपादक तथा तंटामुक्त अध्यक्ष,राजेंद्र वाढई पोलीस चौकी चे इंचार्ज,एस.आय.अकबर खा पठान साहेब व सुरेश ज्ञानंबोमनवार साहेब यांनी टोलेवाही येथे जाऊन चौकशी करून प्रेत खाली उतरवून मृतदेह उप जिल्हा रुग्णालय,मुल येथे शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले.
रिपोर्ट वरून मृतक विरूद्ध मर्ग क्र.८४/२३ कलम १७४ जा.फौ.गुन्हा दाखल केला.व समोरिल तपास मुल पोलिस स्टेशन चे पि.आय.परतेकी साहेब यांच्या मार्गदर्शना खाली करीत आहेत.