सततच्या पाठपुराव्यामुळे देवाडा मायनरच्या शेतकऱ्यांना मिळणार शेतीला पाणी. ★ मागील आठ दिवसापासून बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश.

सततच्या पाठपुराव्यामुळे देवाडा मायनरच्या शेतकऱ्यांना मिळणार शेतीला पाणी.


★ मागील आठ दिवसापासून बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार यांनी केलेल्या प्रयत्नाला अखेर यश.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : बेंबाळ,घोसरी,बोंडाळा बुज,बोंडाळा खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना मागील पंधरा दिवसापासून देवाडा मायनरच्या कालव्याचे पाणी रखडलेल्या कालव्याच्या बांधकामामुळे मिळत नसल्याने उभे पिक पाण्याअभावी करपू लागले होते. याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी सरपंच चांगदेव केमेकार, युवक काँग्रेसचे नेते,प्रशांत उराडे यांच्याकडे संपर्क साधून पाणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केलेली होती.तात्काळ प्रशांत उराडे आणि सरपंच,चांगदेव केमेकार यांनी संबंधित ठेकेदाराला फोनवर बोलून जेसीबीने कालवा सुरळीत करण्यासाठी सांगीतले. 


स्वतः सरपंच चांगदेव केमेकार यांनी शेतकऱ्यांसोबत राहुन कालव्याचे काम करून घेतले परंतु थातूरमाधुर काम केल्याने पाणी शेतापर्यंत पोहोचत नव्हते. त्यामुळे चांगदेव केमेकार तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेब तथा उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग सावली यांच्याकडे निवेदन देऊन पाणी सुरू करण्यासंदर्भात मागणी केली. सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन उपविभागीय अभियंता यांनी देवाडा मायनर कालवा सुरळीत करून शेतकऱ्यांना तात्पुरते शेतीमध्ये पाणी येण्यासाठी सुविधा करून दिली.


मागील आठ दिवसापासून शेतकऱ्यांसाठी पाणी मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेले बेंबाळचे सरपंच चांगदेवजी, केमेकार,प्रशांत उराडे यांचे परिसरातील शेतकऱ्यांनी आभार मानले. उपविभागीय अभियंता सावली यांना निवेदन देताना सरपंच चांगदेव केमेकार,दामोदर देशमुख,मुकुंदा वाढई, चंद्रकांत वाढई, निवृत्तीनाथ फाले,वामन ध्यानबोईवार,अशोक तेलावर,दत्ताजी मार्तीवार,पोचुजी डंकरवार,सिकंदर शेख तथा इतर शेतकरी उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !