‘ दांडिया ’ मुळे आमदार सुभाष धोटे व देवराव भोंगळे समोरा समोर.
★ आरोग्य मंत्र्यांसह शिक्षण विभागा च्या सचिवाकडे तक्रार.
एस.के.24 तास
राजुरा : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना राजुरा विधानसभा प्रमुखाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांनी राजुरा मतदारसंघात दौरे वाढिवले आहे. भोंगळे यांनी नवरात्रीचे निमीत्ताने राजुरामध्ये ‘‘दादांचा’’ दांडिया हा उपक्रम सुरू केला. उपजिल्हा रूग्णालयाला लागून असलेल्या जिल्हा परिषदेेची शाळेत हा कार्यक्रम सुरू असल्याने दांडीयाच्या कर्कश व अतितिव्र आवाजामुळे रूग्णालयातील लहान बाळांपासून, गरोदर माता,व अनेक वयोवृध्दांना मोठा त्रास होत असल्याची बाबत आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकाराची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.त्यामुळे भोंगळे व धोटे आमने-सामने आले आहे.
राजुरा येथे उपजिल्हा रूग्णालयाला लागून जिल्हा परिषदेेची शाळा आहे.या शाळेला शंभर वर्षाची पंरपरा आहे. शाळेच्या पटांगणावर देवदाव भोंगळे यांच्या पुढाकारातून दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी रात्री दांडिया चा कार्यक्रम घेण्यात येत आहे. दांडीयाच्या कर्कश व अतितिव्र आवाजामुळे रूग्णालयात भरती असलेल्या लहान बाळांपासून, गरोदर माता, व अनेक वयोवृध्दांना मोठा त्रास होत असल्याचे नागरिकांनी आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला आहे.
उपजिल्हा रूग्णालय परिसर संवेदनशिल आहे. शासकीय जागा वापराची परवानगी खाजगी कार्यक्रमाला मुख्याध्यापकाने दिलीच कशी हा प्रश्न उपस्थित करित आमदार सुभाष धोटे यांनी याप्रकाराची तक्रार थेट आरोग्यमंत्राकडे केली आहे. रूग्णांच्या सुऱक्षेची बाब लक्षात घेता येथे हेात असलेला दांडीया कार्यक्रम रदद करण्याची मागणी धोटेंनी केली आहे. शाळा स्वतच्या मालकीची असल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी दांडीया महोत्सवाला परवानगी दिली.
परवानगी देतांना शाळा व्यवस्थापन समिती व शहरातील कुठल्याही गणमान्यांना विचारात न घेता त्यांनी स्व:त हा निर्णय घेेतला. त्यामुळे धोटे प्रंचड संतापले असून त्यांनी मुख्याध्यापकाच्या भुमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवित मुख्याध्यापकाची तक्रार शालेय शिक्षण विभागाच्या सचिवाकडे केली आहे. दांडियामुळे आमदार सुभाष धोटे व देवराव भोंगळे आमनेसामने आले आहेत.या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. या प्रकाराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.