शेतकरी संघटना नेते,रविकांत तुपकर यांनी चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार बांधवांशी साधला संवाद.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : शेतकरी संघटना नेते,रविकांत तुपकर यांनी चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकार बांधवांशी साधला संवाद.राष्ट्रपिता महात्मा गांधी,मा.पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज मुल जि.चंद्रपूर येथे ' व्हाईस ऑफ मिडिया ' या पत्रकार संघटनेच्या पत्रकारांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या प्रसंगी पूर्व विदर्भातील पत्रकारांशी संवाद साधून अनेक गोष्टींचा उलगडा झाला.लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.बदलत्या काळात अनेक आव्हानांचा सामना करत आपल्याला पत्रकारिता करावी लागत आहे.ग्रामीण भागात पत्रकारिता करणे जास्त आव्हानात्मक आहे.अशा परिस्थितीत देखील आपण निष्पक्ष पत्रकारितेची परंपरा अबाधित ठेवली आहे.याबद्दल पत्रकार बंधू भगिनींचे जाहीर कौतुक केले.या कार्यक्रमाला आमदार श्रीमती,प्रतिभाताई धानोरकर,लोकमतचे संपादक श्री.संजयजी आवटे,लेखक,संपादक श्री.संदीपजी काळे,श्री.अनिलजी म्हस्के,श्री.विनोदजी दत्तात्रय,ॲड.रितेशजी टहानीयानी,श्री.आनंदजी आंबेकर,श्री.प्रकाशजी कथाले,श्री.किशोरजी कारंजेकर, श्री.मंगेशजी खाटीक,श्री.संजयजी पडोळे यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.