दलीत मित्र प्रा.डी. के. मेश्राम यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त केला देह दानाचा संकल्प.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दिनांक,१७/१०/२३ ' मातीतूनच आला आणि मातीतच गेला " या उक्तीनुसार मानवाच्या देहाची अवस्था आहे माणूस जन्माला आल्या नंतर एक ना एक दिवस तो मृत्यू पावतो हा निसर्गाच्या नियम असून हेच चिरंतन सत्य आहे. तथागत भगवान बुध्दाने देखील धम्मात हेच सांगितले असून त्यांच्या तत्व ज्ञानातून प्रेरणा घेऊन धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून फुलेनगर आरमोरी रोड,ब्रम्हपुरी येथील सेवानिवृत्त प्रा. ज्ञानेश्वर कचरुजी मेश्राम यांनी मरणोत्तर देह दानाचा संकल्प केला.ज्ञानेश्वर मेश्राम यांना पूर्वी पासूनच सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांनी शैक्षणिक सेवा, नोकरी सांभाळून सांस्कृतिक नाट्यकला, सामाजिक प्रबोधन, विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा करिता प्रोत्साहन शिबिरे ,रक्त दान शिबिरे आयोजित करून दलीत आदिवासी अती दुर्गम क्षेत्रात राहणा-या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना २०१८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण ( दलीत मित्र) या शासकीय पुरस्काराने गौरवीले.
शरीर हे नश्वर आहे. माणूस मृत्यू पावल्यानंतर त्याला मातीत पुरले जाते किंव्हा अग्नी देऊन जाळले जाते परंतु त्याच्या शरीराच्या समाजाला काहीच फायदा होत नाही आणि जर का आपण देहदान केलं तर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, त्यांना आपल्या अवयवाचा अभ्यास व विविध पद्धतीने संशोधन करता येईल. तथागत भगवान बुध्दाला स्वर्ग - नरक ,आत्मा या गोष्टी अमान्य आहेत.
आपला आत्मा कुठे असेल हा अनुत्तरित प्रश्न आहे.. म्हणून कर्म कांड रूढी परंपरेच्या भानगडीत न पडता बुध्दाच्या विचारातून प्रेरणा घेऊन दान पारमिताचे अनुसरण करून प्रा. ज्ञानेश्वर मेश्राम यांनी हा एक सामाजिक ऋण फेडण्याचा उद्देशाने छोटासा प्रयत्न केला त्या करिता ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे ऑनलाईन फॉर्म भरून वैद्यकीय अधीक्षक डॉ. कामडी यांच्या कडे सुपूर्द केला या विळी डॉ. नागमोती सर डॉ.मेंढे सर आणि श्रीमती आंबील डुके एन सी डी समुपदेशक मॅडम उपस्थित होते त्याचा हा अवयव दानाचा निर्णय सर्वांना प्रेरणादाई ठरो.