“ जयसुख ”ची तंबाखू गुटखा तस्करी जोरात ; ७ लाखाचा गुटखा जप्त.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्ह्यात सुगंधी तंबाखू व गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बल्लारपूर येथील “जयसुख” या तंबाखू तस्कराने जिल्हाभर जाळे विणले आहे. अशातच रामनगर पोलिसांनी जयसुख याची ७ लाखांची सुगंधी तंबाखू मारुती कारमध्ये पकडल्याने खळबळ उडाली आहे.
बल्लारपूर पोलिसांकडून जयसुख याला अभय मिळत असले तरी पोलिस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी जयसुख या तस्कराच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. जयसुख याची सुगंधी तंबाखू एका चार चाकी वाहनातून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी चंद्रपूर - बल्लारपूर बायपास मार्गावर एका मारुती कारमधून हा सुगंधी तंबाखू गुटखा जप्त केला आहे.