वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ; मुल तालुक्यातील कांतापेठ येथील घटना.

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ; मुल तालुक्यातील कांतापेठ येथील घटना.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं.523 घडली. बंडु विट्ठल भेंडारे वय,58 वर्ष रा. कांतापेठ ता,मुल जिल्हा,चंद्रपूर असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.

मुल तालुक्यातील मौजा,कांतापेठ येथील श्री,बंडु विट्ठल भेंडारे हे गुरांना चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडुन गुरे धावत येत असल्याने कांतापेठ येथील नागरीकांना संशय आल्याने त्यांनी जंगलाच्या दिशेने गेले.


या वेळी बंडू विट्टल भेंडारे यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली.घटना स्थळावर वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी  सारंग बोचे,वनपरीक्षेत्रअधिकारी श्री.राकेश कुमरे,वनपाल श्री,उमेश गवई, वनरक्षक,उन्मेष झिरे,(एन.जी.ओ) मुल एस.के.24 तास चे उपसंपादक तथा तंटामुक्त अध्यक्ष,राजेंद्र वाढई पोलीस चौकी चे इंचार्ज,एस.आय.अकबर खा पठान साहेब व सुरेश ज्ञानंबोमनवार आले.पोहचुन पंचनामा करीत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !