गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला या गावातील २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास.


गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला या गावातील २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने घेतला गळफास.


एस.के.24 तास


गडचिरोली : आपली परिस्थिती कधी बदलणार, आपले जीवन असे का ? वृध्द आईला असे प्रश्न विचारून एका २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली. नागेश दुर्गम वय,२१ रा.टेकडा ताल्ला  असे त्या शेतकऱ्याचे नाव असून म्हातारपणात वृध्द आईचा आधार हरवला आहे.आत्महत्येच्या आदल्या दिवशी आपल्या आईशी शेतीच्या अवस्थेबद्दल बोलत असताना नागेशने हतबल होत प्रश्न केले, हे सांगताना आई पोसक्काला गहिवरून आले.


जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला या गावात मृतक नागेश दुर्गम आपल्या आईसोबत दोन एकरात  मिर्चीची शेती करायचा.यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने त्याला दोनवेळा नुकसान सहन करावे लागले.तिसऱ्यांदा त्याने कर्ज घेऊन २ एकर शेतात पुन्हा मिर्चीची लागवड केली होती.६ ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास पिकावर फवारणी करून घरी परतल्यानंतर नागेश आईजवळ हतबल होऊन शेतकऱ्याचे जीवन असे का ग आई, आपली परिस्थिती केव्हा बदलणार असे प्रश्न करू लागला.


आई पोसक्काने धीर देत आपल्याकडे शेती आहे, तू चिंता नको करू असे समजावून सांगितले.तेवढ्यात नगेशने आईला उद्या फवारणी करायचे आहे त्यामुळे पाणी किती आहे ते बघून ये असे सांगितले.आई शेतात गेल्याचे पाहून नागेशने गळफास घेत आपले जीवन संपविले. वर्षभरापूर्वी आजाराने नागेशच्या वडिलांचा मृत्यू झाला.तीन बहिणीचे लग्न झाले. तर दोन भाऊ वेगळे राहतात. तीन महिन्यानंतर नागेश लग्न करणार होता.परंतु त्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !