ने.हि.महाविद्यालयात महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी परिषदेचे गठण
★ कुणाल नैताम अध्यक्ष तर स्वाती धनविजय सचिव.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,३०/१०/२३ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात सत्र २०२३ - २४ करीता महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी परिषदेची प्राचार्य डॉ डी एच गहाणेंच्या मार्गदर्शनाखाली समिती गठित करण्यात आली.यात अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतल्या गेली,त्यात एम.ए (इंग्रजी)प्रथम वर्षाच्या कुणाल प्रितलाल नैताम हे सर्वाधिक मताने निवडून आले तर सचिव पदासाठी मुलाखती घेऊन एम.ए.(मराठी)ची कु.स्वाती दामोधर धनविजयची नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय कु.प्रांजली नन्नावरे, एम.ए.प्रथम (इतिहास) व कु.निशिका कामतकर, बी.एस्सी.द्वितीय यांची महाविद्यालयात विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून निवड केली गेली.अशापध्दतीने ४८ विद्यार्थी प्रतिनिधी आणि ०८ प्रतिनिधी स्पोर्ट,एन एस एस,एन सी सी, सांस्कृतिक,एस, एसटी,ओ.बी.सी मधून नियुक्त केल्या गेले. महाविद्यायात नविन उत्तम नेतृत्वगुण विद्यार्थ्यांच्या अंगी रुजावे, महाविद्यालयीन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सहभाग असावा यासाठी महाविद्यालयातील स्तरावर ही विद्यार्थी परिषद गठित करण्यात आली.
यासाठी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ.डी.एच गहाणें च्या अध्यक्षतेखाली डॉ.सुभाष शेकोकर,डॉ.धनराज खानोरकर,डॉ के.के.गिल,डॉ प्रकाश वट्टी,डॉ पद्माकर वानखडे,प्रा अभिजित परकरावार,अधीक्षक,संगीता ठाकरे ,आर.एस.मेश्राम यांनी काम पाहिले.सर्वानुमते उत्तम पध्दतीने ही प्रक्रिया राबविण्यात आली.