शासकीय औ.प्र.संस्थेच्या वतीने जटपूरा गेट परकोट किल्ला स्वच्छता अभियान संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्रातील गड किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव. ते शौर्याचे, पराक्रमाचे आणि हिंदवी स्वराज्याचे साक्षीदार तसेच प्रतीक आहेत.या गडकिल्ल्यांना अबाधित ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याने दि. १ ऑक्टोबर रोजी देशात स्वच्छता अभियान राबविले गेले आणि या अभियानात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकांच्या 350 या वर्षाचे औचित्य साधून राज्यातील 350 गडकिल्ल्यांचे स्वच्छता करण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर च्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्याचे निश्चित केले होते.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूरच्या वतीने दि.१ ऑक्टोबर रोजी जटपुरा गेट परकोट किल्ला स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन चंद्रपूर शहर महानगरपालिका चे आयुक्त विपीन पालिवाल यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य रवींद्र मेहेंदळे होते. गटनिदेशक जितेंद्र टोंगे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमधिकारी बंडोपंत बोढेकर, सर्पमित्र विशाल रामेडवार यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकांच्या 350 व्या वर्षीच्या निमित्ताने गडकिल्ले स्वच्छता अभियानाचा उपक्रम शासकीय औद्योगिक संस्थेने हाती घेतला, हे अत्यंत कौतुकास्पद कार्य असल्याचे प्रतिपादन विपिन पालीवाल यांनी यावेळी केले . प्रास्ताविक बंडोपंत बोढेकर यांनी केले तर सूत्रसंचालन अभय घटे यांनी केले. रमेश रोडे यांनी आभार मानले. स्वच्छता अभियान राबविण्यात सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,महेश नाडमवार, नंदू गरड, जयेंद्र आसूटकर,सचिन भोंगळे, कु.रितू लोनगाडगे, विकास जयपूरकर,विजय लाखे,दिपक बोडखे, कु. नैताम, विलास खेडेकर, सचिन भोंगळे आदींनी परिश्रम घेतले.
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानेही सदर स्वच्छता अभियान संस्थेच्या वतीने राबविण्यात आले. या अनोख्या उपक्रमात संस्थेचे सर्व प्रशिक्षणार्थी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच कर्मचारी सहभागी झाले होते.