मच्छी पकडायला गेलेल्या एका युवकाचा मृत्यू ; मुल तालुक्यातील चिखली येथील घटना.
एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील चिखली येथे मच्छी पकडायला गेलेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 11.00 वा. चे दरम्यान घडली.
अंकुश किसन शेंडे अंदाजे वय,20 वर्ष राहणार चिखली येथील युवक आहे.
चिखली येथील दोन युवक सकाळी 11.00 वा.मच्छी पकडायला गेले.दोघांपैकी अंकूश हा भसभोलन तलावाच्या नहरा मध्ये गेला माञ नहर बंद असल्याने तो तलावाच्या नहराच्या भोंग्या मध्ये गेला. मात्र तिथून त्याला बाहेर निघता आले नाही. त्यामूळे त्याचा भोंग्यातील पाण्यातच गुदमरून त्या युवकाचा जीव गेला.
दुसरा युवक हा बाहेर उभा होता पंधरा मिनिटे झाले तरी अजून अंकुश आला नाही त्यामुळे तो घाबरला आणि गावात ही माहिती दिली.त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत अंकुश चा जीव गेला असल्याचे गावकऱ्यांना कळले. त्यानंतर गावकऱ्यांनी तलावाचा पाणी सोडून त्याला बाहेर काढण्यात आले.
घटनास्थळी मुल पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करीत आहे.या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.