चंद्रपूर येथील पडोली चौकात 19,80,000 चे एम.डी.(मॅफेड्रान) पॉवडर अंमली पदार्थासह 28.02,700 रू चा मुद्देमाल जप्त.

चंद्रपूर येथील पडोली चौकात 19,80,000 चे एम.डी.(मॅफेड्रान) पॉवडर अंमली पदार्थासह 28.02,700 रू चा मुद्देमाल जप्त.


एस.के.24 तास


चंद्रपुर : पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अंमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक 30/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की,दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम.डी.ड्रग्ज पॉवडर विक्री करीता सोबत बाळगुन पडोली चौक येथे येणार आहे.सदर माहिती वरीष्ठांना देवुन सदर माहिती वरून पोलीस स्टेशन पडोली हददीत थांबुन असताना एक चार चाकी वाहन ज्याचा क्रमांक एमएच-34- बीआर-5951 ही नागपुर कडुन चंद्रपूरच्या दिशेने येतांना दिसली.


सदर चारचाकी वाहनास थांबवुन झडती घेतली असता, ड्रायव्हरचे सिटचे बाजुला बसलेला इसम नामें शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस यांचे हातातील थैलीमध्ये पांढऱ्या भुरकट रंगाचे पॉवडर M. D. (मॅफेड्रान) वजन 198 ग्राम किंमत 19,80,000/- रू तसेच त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार किंमत अंदाजे 500/- रू मिळुन आले.


सदर कार्यवाही दरम्यान दोन्ही आरोपी नामे 1) शाहरूख मतलूब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर 2) साहील ईजराइल शेख वय 28 वर्ष रा.शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांचे ताब्यातुन 1 ) 198 ग्राम एमडी पॉवडर किंमत 19,80,000/- रू 2) दोन नग विव्हो कंपनीची मोबाईल किंमत 20,000/- रू 3) एक बलेनो कार एमएच-34- डीआर-5951 किंमत 8,00,000/- रू4) आरोपीचे अंग झडतीत नगदी 2200/- रू5) एक लोखंडी तलवार किंमत 500/- रू असा एकुण 28,02,700/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही आरोपींनी अटक करून पो स्टे पडोली अप क्र. 319 / 2023 कलम 8(क), 21 (क) गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 सकलम 4, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि नागेश चतरकर हे करीत आहे.


सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चंद्रपूर . रविंद्रसिंह परदेशी,अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक . महेश कोंडावार सपोनि नागेश चतरकर,पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर,अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण बारसिंगे तसेच पो.स्टे.सायबर चे छगन जांमुळे,अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली आहे

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !