आनंदवनात सु.वि.साठे यांच्या ' गीतांगण ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

आनंदवनात सु.वि.साठे यांच्या ' गीतांगण ' काव्यसंग्रहाचे प्रकाशन 


एस.के.24 तास


वरोरा : आनंदवनात कुष्ठरुग्णांवर उपचार तर झालेच पण कुष्ठमुक्तांनी निरोगी बनून इतरांचीही सेवा करावी हा मंत्र इथे जपला गेला. आणि आता या कामात आनंदवनातील पुढची पिढीही सक्रिय असून नवे प्रयोग करते आहे , असे प्रतिपादन डॉ. विकास आमटे यांनी आनंदवनात केले.


     झाडीपट्टीतील नवसाहित्यिकांच्या  लिहित्या हाताना बळ मिळावे या  हेतूने झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे झाडी शब्दसाधक पुरस्काराचे वितरण काल आनंदवन येथील शांतिनिकेतन निजबल सभागृहात करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. 


     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक  बंडोपंत बोढेकर होते तर पद्मश्री डॉ . परशुराम खुणे ,  आचार्य ना.गो. थुटे , आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू,  झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष कवी अरुण झगडकर , महिला विभाग प्रमुख प्राचार्य  रत्नमाला भोयर, वरोरा शाखाध्यक्ष पंडित लोंढे, मदनराव ठेंगणे, सुभाष उसेवार आदींची उपस्थिती होती.

        

झाडी शब्द साधक पुरस्कार देऊन  प्रा. नामदेव मोरे ,प्रकाश कोडापे,जयंत लेंजे,शितल कर्णेवार,सुनील बावणे ,मंगला गोंगले,वृंदा पगडपल्लीवार ,डॉ.अर्चना जुनघरे ,सुजित हुलके ,संगीता बांबोळे ,धनंजय पोटे ,महादेव हुलके ,वंदना बोढे ,विजय भसारकर  इत्यादींना सन्मानित करण्यात आले तर  रमेश बोपचे (आनंदवन), विनोद देशमुख (घाटकुळ), संतोष मेश्राम (ब्रम्हपुरी) यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.आनंदवनाच्या पावन भूमीत झालेला आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा ऐतिहासिक असल्याचे मत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. 


या कार्यक्रमात ना.गो.थुटे  लिखित काव्यसंग्रह बंद -संबंध चे लोकार्पण करण्यात आले तर कवी सु .वि. साठे यांच्या गीतांगण या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वरानंदन च्या कलाकारांनी स्वागत गीताचे गायन केले तर झाडी गौरव गीताचे गायन सु.वि. साठे  यांनी केले.  सूत्रसंचालन चंद्रकांत कानकाटे,दीपक शिव यांनी केले.  आभार प्रदर्शन भारती लखमापूरे यांनी केले.  कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चंद्रकला मते, माधव चाफले, धनंजय पारके,माधव कौरासे, गणेश पेंदोर , शिरीष दडमल, जितेश कायरकर,मारुती खिरटकर आदींनी परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !