एन.जी.जी.इंग्लिश स्कुल नागभिड येथे तान्हा पोळा पालक शिक्षक याच्यां विशेष उपस्थितीत संपन्न.

एन.जी.जी.इंग्लिश स्कुल नागभिड येथे तान्हा पोळा पालक शिक्षक याच्यां विशेष उपस्थितीत संपन्न.


एस.के.24 तास


नागभीड : एन.जी.जी. इंग्लिश स्कूल नागभिड येथे तान्हा पोळा पालक शिक्षक याच्यां विशेष उपस्थितीत संपन्न झाला.पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी बैलाच्या मेहनती बद्दल व समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येते. याचे औचित्य साधून बहुजन महात्मा बळीराजा, महान सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सांस्कृतिक संघर्षातील महत्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी एन. जी. जी. इंग्लिश स्कूल नागभिड येथे तान्हा पोळा हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. यावेळी एन.जी.जी.इंग्लिश स्कूल नागभिड चे प्रिंसीपल मा.डार्विन कोब्रा सर यानीं सम्राट अशोक, छ. शिवाजी महाराज,महात्मा बळीराजा याच्यां प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आले.

यावेळी सम्राट अशोक कालीन अखंड भारत सुखी संपन्न समृद्ध होता, छ.शिवाजी महाराजांच्या काळात आत्महत्येला थारा नव्हती,महात्मा बळीराजा याच्यां क्रांतिकारी इतिहासातून आजच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे. " इडा पिडा टळू दे,बळीचे राज्य येऊ दे." असा जयघोष केला जातो असे यावेळी स्कुल चे प्रिंसीपल डार्विन कोब्रा सर यानी प्रतिपादन केले. 


यावेळी विद्यार्थ्यांनी छोटे छोटे नंदी बैल घेऊन कार्यक्रमात सहभागी झाले. रंगीत ड्रेसमध्ये, आकर्षक शेतकरी पोषाखामध्ये फलकावर जागृती संदेश दिला.पुजा मॅडम,कविता मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तूचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व पालकांनी कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.


यावेळी कविता गोन्नाडे, रविना भरडकर, मंगला शेंडे, निशा मेश्राम,कविता गोन्नाडे  यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले व सर्वाचे आभार मानले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !