प्रा.आ.केन्द्र.नवेगाव पांडव येथे 'आयुष्मान भव कार्यक्रम'

प्रा.आ.केन्द्र.नवेगाव पांडव येथे 'आयुष्मान भव कार्यक्रम'


एस.के.24 तास


नागभीड : नुकताच १३/०९/२०२३ रोजी प्रा.आ.केन्द्र.नवेगाव पांडव येथे 'आयुष्मान भव कार्यक्रम' पार पाडण्यात आला .या कार्यक्रमात शामराव धारणे सर यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम संबंधाने संपूर्ण माहिती दिली. १/९/२०२३ पासून ते ३१/१२/२०२३ पर्यंत हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.ग्रामपंचायत नवेगाव पांडव चे सरपंच अँड शर्मिला रतनकुमार रामटेके मॅडम यांनी कार्यक्रमा प्रसंगी मोलाचे मार्गदर्शन केले.  


गरोदर माता खर्रा खातात,नसाने दात घासतात यावर प्रकाश टाकला.व्यसन शरीरासाठी, बाळासाठी  किती हानीकारक  आहे हे स्पष्ट केले. गरोदर स्त्रिया या आयरण च्यां गोळ्या  खात नाही,त्या फेकतात यावर चिंता व्यक्त केली.आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायचीअसते असे सांगितले. गोल्डन कार्ड, आभा कार्ड काढा, सरकारी आणि खाजगी दवाखान्यात तुम्हाला त्याचा लाभ  सरकार ने नेमुन दिलेल्या दवाखान्यात मिळेल. या योजनांची माहिती लोकांना सुद्धा सांगा असे मोलाचे मार्गदर्श केले..


या कार्यक्रमाचे निमित्ताने वैद्यकीय अधिकारी, डॉ. निलेश आंबेकर सर यांनी गोल्डन कार्ड आणि आभा कार्ड कसे महत्त्वाचे आहे हे आपल्या भाषणात  सांगितले आणि गरोदर मातांना खुप मोलाचे मार्गदर्शन केले.आरोग्य सहाय्यक खोब्रागडे मॅडम यांनी सुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.पल्लवी गलगट,आरोग्य सहा. शामराव धारने,स्वाती मातेरे,बनकर पिल्लारे , सोंदरकर ,ठेंगरे तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते.


धारने सर यांनी प्रास्ताविकातून गोल्डन कार्ड ,आभा कार्ड, तसेच अवयव दानाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी  प्रतिज्ञा घेण्यात आली.कार्यक्रमाला उपस्थित गरोदर माता जास्त संख्येने उपस्थित होते. आभार अभिजित चौधरी यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !