मुल बसस्थानक येथे व्यवस्थापकाला शिक्षक, विद्यार्थीनींचा घेराव.


मुल बसस्थानक येथे व्यवस्थापकाला शिक्षक,विद्यार्थीनींचा घेराव.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेवर बस सेवा मिळत नसल्याने गत हवालदिल झालेल्या विद्यार्थी शिक्षकांनी अखेर मुल बसस्थानक व्यवस्थापकास घेराव घालून आपला रोष व्यक्त केला व त्वरीत नियोजीत वेळी बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे रेटली.

नवभारत कन्या विद्यालय,मुल मुख्याध्यापिका, शिक्षक व विद्यार्थी यांनी बसस्थानक व्यवस्थापकास घेराव घातला.मुल शहरात पुढील शिक्षणासाठी विदयार्थी मोठया संख्येने मूल शहरात येतात यातील कांतापेठ, चिरोली,सुशि दाबगाव या मार्गावरील विद्यार्थिनींना शालेय वेळेवर बस मध्ये विद्यार्थीना बसू दिले जात नसल्याची ओरड व तक्रार वारंवार करण्यात आली होती.


विद्यार्थ्यांना अपशब्द बोलने, हाकलून देणे हा प्रकार बसस्थानकात प्रशासन करीत असल्याने व महामंडळाचे ढिसाळ नियोजनामुळे दररोज विद्यार्थी,विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या आधी बरेचदा बसेसच्या ढिसाळ नियोजनाच्या तक्रारी चंद्रपूर डेपो व्यवस्थापकाला देण्यात आलेल्या आहेत.मात्र कुणीच लक्ष देत नसल्याने अखेर नवभारत कन्या विद्या.मुल येथील शिक्षक व विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी घेराव घालून बसस्थानक व्यवस्थापकाला वेळेवर बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनातुन केली आहे. शहरातील नवभारत कन्या विद्या, नवभारत कनिष्ट विज्ञान महा. नवभारत विद्यालय येथे ग्रामिण भागातील पासधारक विद्यार्थीनी फार मोठया संख्येने येत असतात हे विशेष.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !