कला शाखेत ही रोजगाराच्या संधीची उपलब्धता एकदिवसीय कार्यशाळ. - प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०९/०९/२३ " महाविद्यालयातील वाणिज्य व विज्ञान शाखेपेक्षा कला शाखा ही अगदी वेगळी शाखा असून या शाखेतून विद्यार्थी चांगल्या प्रकारे पदवीधर झाला आणि त्यांनी स्किल बेसिक सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला तर कला शाखेतही रोजगाराच्या संधी भरपूर आहेत,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.डी.ए.गहाणेंनी केले. ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात नविन अभ्यासक्रमावरील एकदिवसीय कार्यशाळेत अध्यक्षपदावरुन बोलत होते.
विचारपीठावर डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे, डॉ असलम शेख,डॉ धनराज खानोरकर,डॉ मोहन कापगते, डॉ राजू आदे, डॉ वर्षा चंदनशिवे,प्रा बालाजी दमकोंडवार,प्रा सोनाली पारधी उपस्थित होते.सर्वांनी आपआपल्या विषयांबद्दलची इत्यंभूत माहिती नविन प्रवेक्षित विद्यार्थ्यांना दिली.डॉ प्रकाश वट्टींनी रासेयोबद्दल तर डॉ कुलजित गिलनी एन सी सी बद्दल आणि प्रज्ञा मेश्रामांनी काॅलरशिपबद्दल माहिती दिली.
या कार्यशाळेचे संचालन व आभार डॉ.आशिष साखरकरांनी केले.महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते.