धनगरांना आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्याला विखे पाटलाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण. ★ धनगर समाज आंदोलन करण्याच्या आक्रमक पवित्र घेण्याच्या मार्गावर.

धनगरांना आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्याला विखे पाटलाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण.


★ धनगर समाज आंदोलन करण्याच्या आक्रमक पवित्र घेण्याच्या मार्गावर.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सोलापूर : दिनांक.08/09/2023 धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या व्यक्तिला विखे पाटलाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण.विखे पाटलाच्या डोक्यावरती भंडारा उधळला! धनगरांना आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्याला विखे पाटलाच्या कार्यकर्त्याकडून मारहाण.

सध्या महाराष्ट्र आरक्षणाचा तिढा वाढत चाललेला असून फडणवीस सरकार सत्तेवर आले की जातीय आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होतो आणि यामुळे ठिकठिकाणी आंदोलन सुरू होतात, बऱ्याच दिवसापासून धनगर आरक्षण व मराठा आरक्षण सरकार देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार धनगरांना आरक्षण देण्यासाठी टाळाटाळकरत आहे.धनगर समजाच्या आरक्षणाचा मी पूर्ण अभ्यास केला आहे असे मागील काही दिवसापूर्वी फडणवीस ने आम्ही सत्तेवर आल्यावर तत्काळ आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते.


परंतु याला 10 वर्ष होऊन गेली तरी पण सरकारने आरक्षण दिले नाही त्यामुळे धनगर समाज कुठेतरी फडणवीस वर नाराज होताना दिसत आहे.फडणवीस दिलेले शब्द पाळत नाहीत त्यामुळेच मराठा समाज व धनगर समाज यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सध्या गावागावात सुरू आहेत. काल पण याची पुन्हा प्रचिती झाली.जालना येथे सुरू असलेले म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारने तात्पुरता जीआर काढून मराठा समाजाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु मनोज जरंगे पाटील यांनी उपोषणावर ठाम राहण्याची भूमिका घेतलेली आहे.


जोपर्यंत सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर सरकार आज मराठवाड्यातील काही नेत्यांची बैठक घेत असून या बैठकीमध्ये आरक्षण वर तोडगा निघण्याची शक्यता आहे परंतु ओबीसी कोट्यातून जे कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देण्यात येणार आहे त्याला कुठेतरी विरोध होत आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे सोलापूर येथील एका कार्यक्रमात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांना निवेदन देऊन ओबीसी आरक्षण साबित ठेवून धनगर व मराठा आरक्षण द्यावे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी केली. 


मागणी करत असताना या कार्यकर्त्याने विखे पाटील यांच्या डोक्यावरती भंडारा टाकला काही कळण्याच्या आतच विखे पाटील यांच्या सुरक्षा गार्डने व कार्यकर्त्यांनी या धनगर समाजाच्या कार्यकर्त्याला लाथा बुक्क्याने मारहाण केली असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विखे पाटील यांचे कार्यकर्ते या व्यक्तीला मारहाण करत असताना विखे पाटलांनी मध्यस्थी करून त्याला मारू दिले नाही परंतु तोपर्यंत सुरक्षा गार्डन व कार्यकर्त्यांनी त्याचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आहे. 


मारहाण सुरू असतानाही हा कार्यकर्ता धनगर आरक्षण मिळालेच पाहिजे ओबीसींचे आरक्षण ला धक्का न लावता आरक्षण द्या ओबीसीचे आरक्षण सुरक्षित राहिले पाहिजे अशा घोषणा देत राहिला. हा मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर धनगर समाज आणि ओबीसी समाजही कुठेतरी आक्रमक पवित्र घेण्याच्या मार्गावर आहे.जालना येथे झालेल्या मराठा आंदोलनात जो लाठी चार्ज झाला आणि ज्यामुळे वातावरण सर्व महाराष्ट्रात तापून निघाले तसेच आता धनगर आरक्षण मागणार्‍या व्यक्तीला मारहाण केल्यामुळे धनगर समाज ही रस्त्यावर उतरन्याच्या तयारीत आहे.यामुळे सरकारची जास्तच कोंडी होताना दिसत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !