पोलीस स्टेशन,सावली अंतर्गत व्याहाड (खुर्द) येथील इमारतीचे उद्घाटन मा.रवींद्रसिंग परदेशी पोलीस अधीक्षक,जिल्हा चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलीस स्टेशन,सावली अंतर्गत व्याहाड (खुर्द) येथील इमारतीचे उद्घाटन मा.रवींद्रसिंग परदेशी पोलीस अधीक्षक,जिल्हा चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले.


ठाणेदार,आशिष बोरकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : सावली तालुक्यापासून व्याहाड (खुर्द) हे गाव 10 किलोमीटर अंतरावर असून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून मोठी बाजारपेठ असलेला गाव आहे. बाजार पेठेमुळे परिसरातील अनेक गावातील नागरिक दररोज या ठिकाणी येत असतात.

पण काही महिन्या पासून व्याहाड (खुर्द) परिसरात, चोरीच्या घटना,अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या तसेच या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत होते. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यामुळे परिसरातील नागरिकांकडून तसेच पत्रकार बांधवांकडून व्याहाड (खुर्द) येथील बंद असलेली चौकी पूर्ववत सुरू करावी ही मागणी जोरदार होती. 


याची दखल घेत सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार,आशिष बोरकर यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करून ही मागणी करून सातत्याने त्याचा पाठपुरावा केला व त्यांच्या मागणीला यश आले. अखेर 2008 पासून बंद असलेली व्याहाड खुर्द येथील पोलीस चौकी सुरू करण्याची परवानगी मिळाली.त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन सावली अंतर्गत या झालेल्या इमारतीचे तथा कार्यालयाचे नुतनीकरण समारंभ आयोजन  करण्यात आले.सदर इमारतीचे उद्घाटन मा.रवींद्रसिंग परदेशी पोलीस अधीक्षक,जिल्हा चंद्रपूर यांच्या हस्ते नव्याने फीत कापून तर मा.मल्लिकार्जुन इंगळे,एस.डी.पि.ओ. उपविभाग मुल,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आले. 


यावेळी कार्यक्रमात सावली व्याहाड खुर्द परिसरातील उत्कृष्ट कार्य करणारे पोलीस पाटील तसेच सावली तालुक्यातील आपत्ती विभाग टीम व  सहकार्य करणाऱ्यांचे पोलीस अधीक्षक,परदेशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आले.सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक ठाणेदार,आशिष बोरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. 


यानंतर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते,गोपाल रायपुरे,पत्रकार,नासीर अन्सारी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना मार्गदर्शन केले.यानंतर मल्लिकार्जुन इंगळे एस.डी.पि.ओ उपविभाग यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या समारंभाचे उद्घाटक तथा अध्यक्ष मा.रवींद्रसिंग परदेशी यांनी आपल्या मार्गदर्शनातून मनोगत व्यक्त करतांना सर्व प्रथम सावली पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी आणि व्याहाड खुर्द येथील परिसरातील नागरिकांचे अभिनंदन केले. 


मार्गदर्शनात वाहतुकीचे नियम आणि त्याचे काटेकोर पालन कसे करता येईल,पत्रकार हा पोलिसांचा दुवा आहे त्यांनी सुद्धा प्रत्येक घटनेत,एखाद्या उपक्रमात एकमेकांना सहकार्य केला पाहिजे,तसेच नागरिकांनी सुद्धा पोलिसांना वेळोवेळी लागणारी मदत हि धावून केली पाहिजे तेव्हा कुठे हया घडणार्या घटनांना आड बसवता येईल.या पोलीस दूरक्षेत्र कार्यालय च्या वतीने विविध मार्गाने घडणाऱ्या घटना,अवैध पद्धतीने चालणारे गोरखधंदे यांना नियंत्रण आणण्याचा आम्ही यतोयत प्रयत्न करू असे मी आपणास आश्वासन देतो असे मत व्यक्त केले.


या कार्यक्रमाला उपस्थित,सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार,आशिष बोरकर,ठाणेदार परतेकी मुल,ठाणेदार मोहोड पाथरी,ठाणेदार चव्हाण सिंदेवाही,पोंभूर्णा व गोंडपिपरी चे ठाणेदार,उपस्थित होते.तसेच व्याहाड खुर्द येथील सरपंच सुनीताताई उरकुडे,सावली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज बोम्मावर, डॉ.षडाकांत कवठे,उदय गडकरी,प्रशांत गाडेवार,व्यापारी संघटनाचे अध्यक्ष,कविन्द्र रोहणकर, सरपंच,सतीश नंदगिरवार,ग्रामीण पत्रकार अध्यक्ष,अनिल गुरनुले व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष प्रवीण झोडे,प्रकाश सूरमवार,महेश टहलियानी,सकाळचे पत्रकार राहुल रायपुरे,नितीन गोहणे,यांचेसह व्यापारी संघटना, पत्रकार संघ, तसेच परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंदीलवार यांनी केले तर आभार राठोड यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !