गौरीचे विसर्जन व गणपतीचे आगमन.
अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,१९/०९/२३ गणपती बाप्पाचे होणारे आगमन नजरेत साठवून कुमारी के पासून ते सौभाग्यवतींनी दहा पंधरा दिवसाअगोदर गौरी मांडण्याची पूर्वतयारी केली आणि हरितालिकेच्या दिवशी मोठ्या थाटामाटा गौरीचे पूजन करून घरी गौरी मांडल्या. ज्यांनी घरी गौरी मांडल्या त्यांनी रात्रो गौरीच्या समोर डहाके,संभळ,ताळ ढोलकी वाजवून गौरी,गणपतीचे गाणे,भजने गात मनोरंजन केले.
गणपती चे आगमन होणार म्हणून घरी मांडण्यात आलेल्या गौरीचे वाजत- गाजत नदी किनारी , तलाव या ठिकाणी नेऊन गौरी मांडणाऱ्या स्त्रियांनी पूजा- अर्चा करून गौरीचे पाण्यात विसर्जन केले.गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी गावातील तरुण मंडळीनी मंडप स्टेज सजावटीसह विद्युत रोषणाई करून सज्ज ठेवली आहेत.