पाच वर्षानंतर व्याहाड खुर्द ची पोलीस चौकी सुरु होणार. ★ तालुक्यातील हाय वे वर सी.सी.टी.व्ही.बसवले. ★ ठाणेदार,आशिष बोरकर यांचा अभिनव उपक्रम.

पाच वर्षानंतर व्याहाड खुर्द ची पोलीस चौकी सुरु होणार.


तालुक्यातील हाय वे वर  सी.सी.टी.व्ही.बसवले.


★ ठाणेदार,आशिष बोरकर यांचा अभिनव उपक्रम.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक - एस.के.24 तास


सावली : तालुक्यात गुन्हेगारी वर आळा बसवून तालुक्यात शांतता प्रस्थापित करणारे सावली पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार,आशिष बोरकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली व्याहाड खुर्द येथील पोलीस चौकी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती " एस.के.24 तास न्युज चॅनल ला दिली.

        

सावली तालुका हा अतिसवेंदनशील क्षेत्रात येत असून जवळपास दीड वर्षांपूर्वी ठाणेदार,आशिष बोरकर यांनी सावली पोलीस स्टेशन चा पदभार घेतला.सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 55 गावात शांतता व सुव्यवस्था निर्माण केली. सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून जनता आणि पोलीस यांच्यात समन्वय आणून पोलीस विभागाची एक वेगळीच छाप सावली तालुक्यात निर्माण केली. 


सावली तालुक्यातील परिसर खूप मोठा असून सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावाचा अंतर खूप लांब पडतो.सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द व व्याहाड बुज परिसरातील अनेक गावे सावली पासून खूप लांब पडत असल्याने नागरिकांना एखाद्या घटनेची तक्रार नोद करायला खूप अंतर गाठावे लागत असे.जनतेला होणारा हा त्रास बघता सावली पोलीस स्टेशन चे ठाणेदार,आशिष बोरकर यांनी पाच वर्षांपूर्वी बंद असलेली व्याहाड खुर्द येथील पोलीस चौकी सुरु करण्याचा निर्णय घेतला.

      

तालुक्यातील जनतेला येणाऱ्या समस्याचे निराकरण वेळोवेळी करण्याचे कार्य करून मार्गदर्शन सावलीचे ठाणेदार नेहमीच करतात.व्याहाड बुज ते सावली या हाय वे च्या रस्त्यावर  ते सावली तालुका व तालुक्यातील काही गावात सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवून एक नवीन उपक्रम राबविण्याचे कार्य केले. हाय वे वर सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवल्याने बेधुंद व बेसावध पणे गाडी चालवाणाऱ्या वाहतूक धारकांवर नियंत्रण बसले आहे,तर दररोज शिक्षणाकरिता सावली - गडचिरोली जाणारे विध्यार्थी -विध्यार्थीनी व रात्रौ बे रात्रौ येणारे -जाणारे प्रवासी सी.सी.टी.व्ही कॅमेरामुळे सुरक्षित असल्याचे दिसत आहेत.

          

नेहमीच युवक /युवती यांना पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन,सुरक्षात्मक उपाय याची माहिती जणसामान्यपर्यंत देणारे व स्पर्धात्मक कार्यक्रमाचे तालुक्यात आयोजन करून तालुक्यातील जनतेला एकत्रित आणणारे ठाणेदार,आशिष बोरकर आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची छाप तालुका वासिय जनतेच्या मनात उमटवत आहेत हे विशेष.


सावली तालुक्या अंतर्गत येणारा परिसर हा खूप मोठा असून लांब अंतरापर्यंत पर्यंत गावे आहेत.जनतेस एखादी तक्रार दाखल करायची असल्यास सावली पोलीस स्टेशनला यायला होणारा त्रास पहाता व्याहाड खुर्द येथील पोलीस चौकी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.तर जनतेच्या सुरक्षे करिता सावली शहर व तालुक्याअंतर्गत येणाऱ्या गावात तसेच हाय वे वर आतापर्यंत लोकसहभागातुन व प्रशासना कडून 40 सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवले आहेत. - ठाणेदार,आशिष बोरकर,पोलीस स्टेशन सावली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !