विदर्भ (पूर्व) विभागीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी प्रा.डॉ.अशोक सालोटकर यांची नियुक्ती.
★ समाजासाठी सेवाभावणेने पुर्ण वेळ कार्य करणार. - प्रा.डॉ.अशोक सालोटकर
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,१७/०९/२३ महाराष्ट्र नाभिक महामंडळ, विदर्भ (पूर्व) विभागाच्या विभागीय सभेचे आयोजन ब्रम्हपुरी,जिल्हा चंद्रपूर येथे शनिवार दि.१६ सप्टेंबर २०२३ ला श्री.केशवराव सूर्यवंशी यांचे निवास्थानीय सभागृहात करण्यात आले होते. या सभेला महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.श्री.बंडूभाऊ राऊत तथा प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री.श्यामभाऊ आस्करकर हे प्रमुख अतिथी तर अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक श्री.केशवराव सूर्यवंशी होते.
उपस्थित मान्यवरांचे हस्ते संत सेनाजी महाराज व संत नगाजी महाराज यांचे प्रतिमेचे विधीवत पूजन करून माल्यार्पण करून सभेला सुरवात करण्यात आली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बंडूभाऊ राऊत व प्रदेश उपाध्यक्ष श्री. श्यामजी आस्करकर यांनी सभेला विविध विषयावर अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.
विदर्भ पूर्व विभागीय कार्यकारिणीत खालील पदाधिकारी यांची निवड करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
1.अध्यक्ष - श्री राजेंद्र इंगळे
2.कार्याध्यक्ष-श्री. नामदेवराव शेंडे
3.उपाध्यक्ष-श्री मधुकरराव फुलबांधे
4.उपाध्यक्ष- प्रा.डॉ. अशोकराव सालोटकर
5.उपाध्यक्ष-श्री नामदेवराव इझनकर
6.संघटन सचिव -श्री. मोहनराव निंबाळकर
7.संघटन सचिव- प्रा.डॉ. संदीप लांजेवार
8. संघटक- श्री धनराज गुंडलवार
9.. संघटक- श्री. पुरुषोत्तम राऊत
या सभेला नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र फुलबांधे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. राजू चिंचाळकर, जिल्हा कार्य. सचिव श्री.विजय वालूकर, कौशल्य विकास प्रशिक्षक श्री.धरमजी अतकरे तथा ब्रम्हपुरी तालुका व चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ विभागाचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांनी केले.तर वकृत्वपुर्ण संचालन प्रा.डॉ.अशोकराव सालोटकर यांनी तर आभार ब्रह्मपुरी संघटनेचे सुनील मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रश्मी पगाडे,शालु फुलबांधे,रजनी सुर्यवंशी, प्रदिप मेश्राम, घनश्याम सुर्यवंशी,विनायक शेंडे,धनंजय पगाडे,विजय मेश्राम,नारायण लांजेवार इ.परिश्रम घेतले.