मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल. - मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे

मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल. - मुख्यमंत्री,एकनाथ शिंदे

एस.के.24 तास

मुंबई : (प्रतिनिधी : दशरथ कांबळे) जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.अपर पोलीस अधिक्षक व उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत  करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही.आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून सांगण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !