राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीपटूचा नदीत बुडून मृत्यू.
एस.के.24 तास
चंद्रपूर : राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीगीर साहिल प्रविण घुमे (१४,रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड) याचा इरई नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
साहिल घुमे हा विठ्ठल मंदिर व्यायामशाळेचा कुस्तीपटू होता.मंगळवारी सायंकाळी त्याची व्यायामशाळेत कुस्ती स्पर्धा होती. कुस्ती स्पर्धेला जाण्यापूर्वी साहिल हा आपल्या दोन मित्रांसह शहरालगत असलेल्या इरई नदीत पोहायला गेला. इरई नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब त्यांच्या दोन मित्रांना समजताच त्यांनी शहरात धाव घेत माहिती दिली. शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.