शिक्षकांनी गुरू शिष्य परंपरा जोपासली पाहिजे. - डॉ सुभाष शेकोकार.
★ शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख ने.हि. महाविद्यालय ब्रम्हपुरी यांचे प्रतिपादन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०६/०९/२३ गुरु - शिष्य परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. पुर्वी निषिद्ध उपनिषिध यात आपण गुरू शिष्य परंपरा पाहतो आहे. आज ही माणसाला वैचारिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मार्गदर्शकाची वेळोवेळी गरज पडते .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा आपले तीन गुरु मानले होते. भगवान बुद्ध,संत कबीर व महात्मा जोतिराव फुले यांना गुरू माणून यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजातील विषमता नष्ट केली, स्वातंत्र्य समता व बंधुता हृया बींजाची पेरणी केली. तसेच विचार शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविणारे शिक्षण महर्षी व विचारवंत म्हणून भारताचे पहिले उपराष्ट्रपती ते राष्ट्रपती असा प्रवास सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा आहे.त्यामुळे भारत सरकारने त्यांना भारत रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले. नक्कीच यांचे विचार आजच्या शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले.
ते एक शिक्षक होते त्यांनी परंपरा जोपासली आणि म्हणून शिक्षकांनी गुरू - शिष्य परंपरा जोपासली पाहिजे असे विचार डॉ सुभाष शेकोकार यांनी नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे राष्ट्रीय सेवा योजनादलाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर उपस्थित डॉ रेखा मेश्राम वाणिज्य विभाग प्रमुख, डॉ आर. के. डांगे कला विभाग प्रमुख, डॉ भास्कर लेनगुरे डॉ प्रकाश वट्टी, प्रा बालाजी दमकोंडावार, डॉ विवेक नागभिडकर, डॉ वर्षा चंदनशिवे, डॉ दर्शना उराडे, प्रा अभिमन्यू पवार, मेजर विनोद नरड सर, प्रा निलीमा रंगारी व डॉ धनराज खानोरकर हे उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केलेआणि आपल्या गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी डॉ रेखा मेश्राम यांनी शिक्षक व विद्यार्थी हे अतुट नाते जोपासले पाहिजे व शिष्यांनी गुरुचा आदर केला पाहिजे. असे मौलिक विचार व्यक्त केले.
डॉ.आर. के.डांगे यांनी गुरु हे नेहमी विद्यार्थ्यांकरिता पथदर्शक असतात. ही बाब समजून शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असे विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ प्रकाश वट्टी यांनी केले सूत्रसंचालन कु शितल भाजीपाले तर आभार कु. सुषमा ठूसे हीने केले. सर्व गुरूजनांना गुरूवंदना म्हणून रासेयो स्वयंसेविका चैतन्या राऊत आणि ग्रुप नी कौतुकास्पद नृत्य सादर केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाल करंबे, सुरज के. मेश्राम, मयुरी ठेंगरी, विवेक वैरागडे, विक्रम मानकर, प्रांजली प्रधान, मयुर भागडकर , चैतन्या राऊत, प्रमोद ढोरे, गणेश बगमारे, सृष्टी बाकडा, स्वाती धंदरे, पूजा बगमारे, जुही वासेकर यांनी परिश्रम घेतले.