खरबी,माहेर गावातील नियोजित बस थांब्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबवा- शिवसेना उबाठा ची मागणी.

खरबी,माहेर गावातील नियोजित बस थांब्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी बस थांबवा- शिवसेना उबाठा ची मागणी.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक 


ब्रम्हपुरी : दिनांक,२७/०९/२३ ब्रम्हपुरी तालुक्यातील खरबी, माहेर व तुमडीमेंढा या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी ब्रम्हपुरी येथे येतात.त्यासाठी विद्यार्थी नियोजित थांब्यावर बसची वाट पाहत ताटकळत असतात. परंतु सदर नियोजित थांब्यावर बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची माहिती शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या उपजिल्हाप्रमुख प्रा.अमृत नखाते यांना मिळाली.


 त्यांनी सदर समस्येची तात्काळ दखल घेत तहसिलदार ब्रम्हपुरी व एस.टी.महामंडळ आगाराचे आगार व्यवस्थापक ब्रम्हपुरी यांना सदर समस्या सोडविण्याबाबत निवेदन दिले.एस.टी.महामंडळ आगाराचे आगार व्यवस्थापक ब्रम्हपुरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता, सदर समस्येला गांभीर्याने घेत एस.टी. महामंडळाचे चिमूर येथील आगार व्यवस्थापक यांना पत्र देत समस्या सोडविण्यास सांगितले.


 चिमूर येथील आगार व्यवस्थापकांनी सकारात्मक प्रतिसाद देत, नियमित वेळेवर एस.टी.बस थांबविण्याची ग्वाही दिली. यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख शामराव भानारकर,उपतालुका प्रमुख डॉ. रामेश्वर राखडे, शाखा प्रमुख गणेश बागडे, नारायण अमृतकर,मेश्राम सर सावित्री बाई फुले विद्यालय ब्रम्हपुरी,देवेंद्र अमृतकर,महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका उर्मिला अलोने,तालुका संघटिका कुंदा कमाने, शहर संघटिका ललीता कांबळे,राखी बानाईत आदी शिवसैनिक व पालकवर्ग,विद्यार्थिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !