चंद्रपूर मध्ये टोंगे चे उपोषण सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री शनिवारी चंद्रपूरात,ओबीसींच्या मागण्या तोंडी मान्य.
एस.के.24 तास
चंद्रपूर : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये,या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पुकारलेल्या अन्नत्याग आंदोलनाला यश आले आहे.मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार यांनी ओबीसी संघटनांसोबत झालेल्या बैठकीत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात कोणत्याही परिस्थिती समावेश केला जाणार नसून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: टोंगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी शनिवार ३० सप्टेंबरला चंद्रपूरात येणार आहे.
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करू नये या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नागपूर व चंद्रपूरात आंदोलन पुकारले होते. चंद्रपूरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला १९ दिवस पूर्ण झाले आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान ओबीसी आंदोलनाचा वाढता दबाव पाहून सरकारने मुंबई येथे २९ सप्टेंबरला आंदोलक ओबीसी संघटनांची बैठक बोलावली.
या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजीत पवार यांनी ओबीसींच्या मागण्या तोंडी मान्य केल्या आहे. मागण्यांवर सकारात्मक चर्चा केली. मराठा समाजाचा कोणत्याही परिस्थिती ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला जाणार नसून त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूरात मागील १९ दिवसांपासून सुरू असलेले रविंद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडविण्यासाठी ३० सप्टेंबरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळी ९ वाजता चंद्रपूरात येणार आहे.
जिल्हा बंद आंदोलन स्थगित : -
ओबीसींच्या मागण्या तोंडी मान्य करण्यात आल्याने तसेच मराठा समाजाचा कोणत्याही परिस्थितीत ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश केला जाणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिल्याने आज ३० सप्टेंबर २०२३ ला होणारे चंद्रपूर जिल्हा बंद आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी सांगितले.