थेट सीईओंच्या खुर्चीत बसला ; पोलीस अधीक्षकांनी कार्यालयात बोलवून स्वागत केले ; असं काय केलं सोहमने वाचा सविस्तर.
एस.के.24 तास
चंद्रपूर : दररोज आठ तास अभ्यास,आठ तास झोप, मित्रांसोबत चर्चा आणि आठवड्याला एक चित्रपट हा आयएएस होण्याचा सुकर मार्ग आहे अशी चर्चा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी करण्याऱ्या सोहम सुरेश उईक या आठव्या वर्गातील विद्यार्थीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी थेट आपल्या खुर्चीत बसवले तर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी कार्यालयात बोलवून त्याचा सत्कार केला.
चंद्रपूर हा ओघोगिक आदिवासी जिल्हा आहे.मात्र या जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तेची कमी नाही,अनेक हुशार विद्यार्थी आज अधिकारी, डॉक्टर,अभियंता तसेच इतर मोठ्या पदापर्यंत पोहचले आहेत.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोंगरहळदी पंचायत समिती पोंभुर्णा या शाळेतील सोहम सुरेश उईके या विद्यार्थ्याने मागील आठवड्यात सकाळच्या सुमारास सायकलिंग करताना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी भेट झाली होती. यावेळी सोहम उईके याने पोलीस अधीक्षक यांना भविष्यात आयएएस होण्याचे स्वप्न बोलून दाखविले. नियमित आठ तास अभ्यास,आठ तास झोप,एक तास मित्रांसोबत गप्पा आणि आठवड्याला एक चित्रपट या मार्गाने गेल्यास प्रत्येकाचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार होईल असे सांगितले.