कळमना येथे सामुदायिक रक्षाबंधन : महिलांनी झाडांना राख्या बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे प्रेरणा ग्राम संघ कळमना व ग्रामपंचायत कळमना यांच्या संयुक्त विद्यमाने सामुदायिक रक्षाबंधन व वुक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी सरपंच नंदकिशोर वाढई व अन्य माण्यवरांना राख्या बांधल्या तसेच गावातील स्मशानभूमीत स्थित आॅक्सीजन पार्क येथील वृक्षांना राख्या बांधल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कळमनाचे सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, सामुदायिक रक्षाबंधन व झाडांना राख्या बांधून वुक्ष संवर्धन व पर्यावरण संरक्षणाचा दिलेला संदेश अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे बहीण भावाच्या प्रेमळ नात्यात अधिक आनंद निर्माण होईल. त्याच बरोबर वुक्ष संवर्धन मोहीम अधिक बळकटी होईल असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी सरपंच नंदकिशोर वाढई, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रामपंचायत सदस्य रंजना पिंगे, सुनीता उमाटे, ग्रामसेवक मरापे शिक्षिका गोखरे मडम दुधे मडम, उमेद समन्वयक बुरांडे, बोढे, रामटेके, माजी सरपंच राजु पिंपळशेळे, क्षावण गेडाम, प्रेरणा ग्राम संघ अध्यक्ष मिना भोयर, सचिव मनिषा धनकड, उमेद च्या सुनिता धांडे, संगीता उमाटे मनिषा आबिलकर, सुनिता धांडे,माया कुकडे,सुषमा वाढ ई, सुनिता वाढ ई, शोभा आताम, लता आताम, सुनिता गौरकर कल्पना क्षिरसागर शोभा गेडाम इंदिरा मेक्षाम संगीता अटकारे शिपाई सुनील मेश्राम विशाल नागोसे,यासह अनेक महिला व अन्य मान्यवर उपस्थित होते.