पनवेल महानगरपालिकेच्यावतीने नेहरू हाॅकी स्पर्धा २०२३-२०२४ संपन्न.
★ १५ वर्षे मुले,१७ वर्षे मुले व मुली यांच्या स्पर्धांचे आयोजन.
एस.के.24 तास
नवी मुंबई : (प्रतिनिधी: दशरथ कांबळे) क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा कार्यालय अलिबाग,पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच हाॅकी रायगड यांच्या सहकार्याने आज दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी मोहोपाडा येथील प्रिया स्कूलच्या भव्य प्रांगणात जिल्हास्तरीय ज्यूनियर व सब ज्युनिअर नेहरू हॉकी स्पर्धा २०२३-२०२४ संपन्न झाल्या.
मा.आयुक्त श्री.गणेश देशमुख व अतिरिक्त आयुक्त श्री. भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी पनवेल महापालिकेच्या क्रिडा व सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे , क्रिडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख नामदेव पिचड उपस्थित होते. या स्पर्धेसाठी हॉकी महाराष्ट्राचे खजिनदार ,हाॅकी रायगडचे सचिव कैलास सोनार , क्रिडा समन्वयक समीर रेखावे , प्रिया स्कूलचे क्रिडा शिक्षक भैय्यासाहेब भदाणे ,पनवेल मधील सर्व शाळांचे क्रिडा शिक्षक व पंच उपस्थित होते.
१५ वर्षे मुले ,१७ वर्षे मुले व मुली यांच्यात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी रायगड जिल्हा हाॅकी असोसिएशन रायगडचे बदाने सर व पंच उपस्थित होते. महापालिका कार्यक्षेत्रातील एकुण 12 शाळांनी यास्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पनवेल महानगरपालिकेच्या क्रिडा व सांस्कृतिक विभागाच्यावतीने सुमारे ४९ प्रकारच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या नियोजनासाठी मागील महिन्यांमध्ये सर्व शाळांच्या क्रिडा शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या क्रिडा स्पर्धांमधील सुब्रतो मुखर्जी फुटबाॅल स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या असून आज मोहपाडा येथील प्रिया शाळेमध्ये नेहरू हाॅकी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यानंतर विविध ठिकाणी नियोजित तारखेस उर्वरीत स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.