आझाद युवा गणेश मंडळ मुरसा तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन.

आझाद युवा गणेश मंडळ मुरसा कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना... मान्यवर


आझाद युवा गणेश मंडळ मुरसा तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन.


एस.के.24  तास


भद्रावती : आझाद युवा गणेश मंडळ मुरसा च्या वतीने नवीन पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.या गणेश उत्सवाचा उद्देश गावाचा विकास करायचा असेल तर तरुणांनी एकत्र येवून समाज जागृती करण्याचे काम करून आजच्या पिढीमध्ये  सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी या उद्देशाने आझाद युवा गणेश मंडळ मुरसा च्या वतीने गावातील  मुलांच्या कौशल्याला वाव मिळावा.

स्पर्धा मध्ये सहभागी झालेली मंडळी

महिलांना चूल व मूल यापूर्तेच मर्यादित न राहता आपल्या मधे असलेल्या कौशल्याचा विकास करून स्व बळावर पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन व संपूर्ण गाव एकत्रित येवून सामाजिक व विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करावे व समाज सोबतच विकास अश्या विविध हेतूने मंडळा तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये 20/9/2023 ते 26/9/2023 या कालावधीत रोज नवीन नवीन सर्धांचे आयोजन करण्यात आले.

त्यामधे चमचा चोरी,पोटाटो रेस,वॉटर रिले,फुगा खेळ,उलटा फुलटा,रांगोळी स्पर्धा,तसेच भावी आयुष्याचा विचार करता आदर्श गाव,आदर्श शाळा हा  विषय घेऊन निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या व मडका फोडी स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.सोबतच विजेते चमुंना गावातील तसेच बाहेर गावातील प्रतिष्ठित नागरिकानि विशेष आकर्षक भेट वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आले व विजेत्यांचे प्रोत्साहन वाढविले.


या कार्यक्रमाला गावातील ग्रामपंचायत,तंटा मुक्ती समिती,पोलीस पाटील सर्व आजी माझी पदाधिकाऱ्यांची तसेच समस्त मुरसा गाववाशी एकत्रित उपस्तीथी होती.


या तरुणांनी केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल गावातील तंटा मुक्त समिती अध्यक्षा सौ कल्पना बोधाले यांनी आझाद युवा गणेश मंडळ मुरसा च्या समस्त युवकांना व पदाधिकर्यांना सन्मानचिन्ह  देऊन मंडळाचे प्रोत्साहन वाढवून गौरविण्यात आले.


गणेश विसर्जनाची  विशेष बाब म्हणजे आजच्या तरुण पिढीच्या मनात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व एक आदर्श गाव या युवकांच्या माध्यमातून निर्माण व्हावा या साठी गणेश मूर्तीचे विसर्जन कोणत्या DJ च्या किंवा बँड च्या गजरात नव्हे तर निसर्गाची जोपासना करत पारंपरिक पद्धतीने भजन व शाळकरी मुलांच्या लेझिमच्या गजरात तसेच गावातील लहान बाळ गोपालांच्या हाती सामाजिक संदेश देणारे चित्रीकरण व  समजिक सुविचार देऊन गणेश मूर्ती ची मिरवणूक मोठ्या दिमाखात गावातील युवक युवती सोबतच संपूर्ण मुरसा गाववाशी एकत्र येऊन पाडण्यात आले,यात संपूर्ण मुर्सा ग्रामवाशी भजनाच्या नादात तल्लीन होऊन  रॅलीमध्ये सहभागी झाले.


 व गणेश विसर्जनाचा आनंद घेतला व एक बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या बंधीकीने गणेश उत्सवाची सुरवात केली त्याचे फलित मुरसा वासीयांनी प्रत्येक्षात आपल्या मुरसा गावात करून दाखविले या गणेशोत्सवाची वाहवाही भद्रावती तालुक्यात सर्वोत्र होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !