सावली पंचायत समिती चे रजा मंजुरीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली लाच.
★ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक केली.
एस.के.24 तास
सावली : चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लाचलुचपत विभागाने धाड टाकली.यात गट शिक्षण अधिकारी एका शिक्षकाला लाच मागितल्याचा आरोप आहे.निलंबीत शिक्षक,मिलिंद चांदेकर यांचे निलबन काळातील रजा मंजूर प्रकरणात 10 हजार लाच घेतांना कारवाई केली.जि.प.शाळा राजोली फाल येथील माजी शिक्षक,मिलिंद चांदेकर यांचेकडून लाच घेतली.आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सावली येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहात अटक करण्यात आली.लोकनाथ जैराम खंडारे असे लाचखोर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे नाव आहे.
तक्रारदार हे प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत आहेत.त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते सहा महिने वैद्यकीय रजेवर गेले होते.तक्रारदारांच्या सहा महिन्यांच्या वैद्यकीय रजा मंजू नसल्याने त्यांना वेतन अदा करण्यात आले नाही.त्यामुळे त्यांनी सदर कालावधी मधील त्यांचे वैद्यकीय रजा मंजुरी करिता पंचायत समिती सावली येथे अर्ज केला.मात्र रजा मंजूर करण्या करिता गटशिक्षणाधिकारी खंडारे यांनी लाच मागितली.
आठ हजार रुपयांत तडजोड झाली.मात्र तक्रारदारा ला लाच द्यायची नसल्याने त्यांनी चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यांनी सापळा रचून बुधवारी गटशिक्षणाधिकारी,लोकनाथ खंडारे यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.ही कारवाई पोलिस उपअधीक्षक,मंजूषा भोसले यांच्या मार्गदर्शनात हिवराज नेवारे,रोशन चांदेकर,नरेशकुमार नन्नावरे,पुष्पा काचोळे,सतीश सिडाम यांनी केली.