सिंदेवाही तालुक्यात वीज कोसळून एक महिला ठार ; एक महिला जखमी.
एस.के.24 तास
सिंदेवाही : तालुक्यात सध्या धान पिकाचे उत्पन्न घेणे सुरु असून धानपिकाचे काम करण्यासाठी पुरुष व महिला मजूर वर्ग मुठीत जीव धरून पोटाची खडगी भरण्यासाठी शेतीचे काम करण्यास जात आहेत.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मौजा सिरकाडा येथील काही महिला प्रदीप यादव बोरकर रा. सिरकाडा यांच्या शेतात निंदन काढण्यासाठी गेले. मात्र निसर्गात अचानक बदल होऊन वीज कडकडाटा सहित पाण्याने रुद्र रूप धारण केल्याने महिला घराकडे जाण्यासाठी निघाले असता वीज पडून सौ. महानंदा मोतीराम अलोणे (मयत ) रा. सिरकाडा या जागीच ठार झाल्या त्यांचे अंदाजे वय 64 वर्ष असल्याचे समजते तर सौ. रोषणा प्रफुल गेडाम (जखमी ) रा.सिरकाडा वय अंदाजे 35 वर्ष या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे हलवले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.ही घटना दिनांक 20/9/2023 ला ठीक 1 वाजे च्या दरम्यान घडली.
तत्पूर्वी या घटनेची माहिती पोलीस प्रशासन सिंदेवाही ला कळवले असते मा. बिट अमलदार बावणे साहेब तसेच नागदेवते साहेब उपस्थित झाले असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत असल्याचे समजले.