तलाठी पदभरतीची परीक्षा अमरावती च्या परीक्षा केंद्रा वरून पेपर फोडणाऱ्या एका उमेदवाराला अटक.

तलाठी पदभरतीची परीक्षा अमरावती च्या परीक्षा केंद्रा वरून पेपर फोडणाऱ्या एका उमेदवाराला अटक.


एस.के.24 तास


अमरावती : पहिल्याच दिवशी पेपरफुटीच्या घटनेने गाजलेली तलाठी पदभरतीची परीक्षा काहीसी रुळावर आली होती.मात्र, सोमवारी तिसऱ्या पाळीमध्ये हायटेक उपकरणांसह पेपर फोडणाऱ्या एका उमेदवाराला अमरावती येथे अटक करण्यात आली आहे.


यावेळी परीक्षा केंद्रात असणाऱ्या अन्य उमेदवारांनी सांगितले की, परीक्षा सुरू झाल्याच्या एका तासानंतर या उमेदवाराला पोलिसांनी पकडले. मात्र, पोलिसांनी सांगितले की, परीक्षा सुरू होण्याआधी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतानाच त्याला पकडण्यात आले. माधव इन्फोटेक अमावती ड्रेमलॅड मार्केट असे या परीक्षा केंद्राचे नाव आहे. परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवार आत बसून गैरप्रकार करत होता,तर पोलीस याउलट उत्तर देत असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.


नांदगाव पेठ पोलीस स्टेशन,अमरावती येथे पोलिसांकडून सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून, महसूल विभागाअंतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. परंतु, परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षेदरम्यान होणाऱ्या विविध गोंधळ आणि गलथान कारभारामुळे ही परीक्षा चांगलीच चर्चेत राहिली आहे. अमरावतीमध्ये गैरप्रकार करणारा उमेदवार पकडण्यात आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !