प्रा.आरोग्यवर्धिणी केंद्र जिबगांव येथे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स व रिक्त असलेल्या जागा त्वरित भरा. - राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी

प्रा.आरोग्यवर्धिणी केंद्र जिबगांव येथे वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स व रिक्त असलेल्या जागा त्वरित भरा. - राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथे एम बी बी एस गेडाम यांना वैद्यकिय अधिकारी म्हणून पदभार दिले होते त्यानंतर एम.बी.बी.एस गेडाम यानी आगस्ट महिण्यातच पुढील शिक्षणासाठी राजीनामा देऊन गेले असता,तेव्हापासूनच बि एम एच गोबाडे यांनी पदभार घतले आहेत. त्यांची पन बाऊन २० सप्टेंबर ला संपत असल्याचे माहिती होत असल्याने त्या ठीकाणी नव्याने पुरुष व महिला वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी जिबगांव वासियाकडून होत आहे.


तर प्रा आरोग्यवर्धीनी केंद्र जिबगांव येथे नर्स गोटलगे हि पन पुढील शिक्षणासाठी राजीनामा दिला असुन त्या ठिकाणी स्टाफ नर्स ची नियुक्ती करण्यात येवुन रुग्णांना योग्य मोफत सेवा मिळावी. या करीता ता. आरोग्य अधिकारी डॉ,धनश्री मर्लावार मॅडम यांचे मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी गलोहत यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.त्यावेळी निवेदन देताना राकेश गोलेपल्लीवार ग्रा प सदस्य जिबगांव व विक्रांत भोयर उपस्थित होते.


जिबगांव रुग्णांना योग्य सेवा मिळावी म्हणून जिबगांव येथे मोठा असा दवाखाना ची निर्मिती करण्यात आली, पन त्या ठिकाणी डीलवरी, गरोदर मातांचे तपासणी,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येत नाही आणि या ठिकाणी मुख्यालय अधिकारी कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने त्वरीत प्रा.आरोग्यवर्धीनी केंद्र जिबगांव येथे नव्याने पुरुष व महिला वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स ची नियुक्ती करण्यात यावी.


 व रिक्त असलेल्या जागा त्वरित नियुक्ती करण्यात यावी,तसेच गरोदर महिलांना लोंढोली आरोग्यवर्धीनी येथे महिलांना तपासणी व इतर टेस्ट करिता जावे लागत असल्याने नाहक त्रास सहन करावे लागत असल्याने वरील दोन्ही पदे भरून जिबगांव आरोग्य वर्धीनी मध्येच सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रा.पं.सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !