भाजपा अनु.जाती मोर्चा भंडारा जिल्हा महामंत्री पदी इंजि.मंगेश पुरणनाथ मेश्राम यांची सलग तिसऱ्यांदा निवड.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : भारतीय जनता पार्टी भंडारा जिल्हा कार्यकारणी मध्ये लाखनी तालुकातील मानेगाव /स. येथील रहवाशी इंजि. मंगेश पुरणनाथ मेश्राम यांची भाजपा अनु. जाती मोर्चा भंडारा जिल्हा महामंत्री पदी पुनःच्छ सलग तिसऱ्यांदा निवड झालेले आहे.इंजि. मंगेश मेश्राम भारतीय जनता पक्षाचे आक्रमक नेते म्हणून जिल्ह्यात ओळख आहे.स्वतःच्या कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व मुळे त्यांचा मतदार संघात ओळख निर्माण झाली आहे. अनु. जातीच्या विविध योजना समाजापर्यंत पहोचवण्याचे कार्य उल्लेखनीय आहे.शिवश्री बहु. संस्थेच्या माध्यमातून कोरोना काळात गरजू व्यक्तीला अन्नधान्य किट,सॅनिटायजर,मास्क चे वितरण केले.विद्यार्थी काळापासून सामाजिक कार्याची त्यांची आवड होती.
इंजि.मंगेश मेश्राम याअगोदर सुद्धा जिल्हा महामंत्री होते उपाध्यक्ष, महामंत्री,महामंत्री असा त्याचा पक्षाचा प्रवास आहे.शिव,फुले,शाहू,आंबेडकर याच्या विचाराधरेशी आणि भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जिल्हात ओळख आहे. नियुक्तीचे श्रेय माजी राज्यमंत्री महाराष्ट्र डॉ.परिणयजी फुके, भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनीलजी मेंढे, भाजपा भंडारा -गोंदिया लोकसभा समन्वयक विरेंद्रजी अंजनकर, भाजपा भंडारा जिल्हाध्यक्ष प्रकाशजी बाळबुधे, माजी आमदार साकोली विधानसभा क्षेत्र बाळाभाऊ काशीवर यांना दिले.