व्याहाड बुज.येथील आदर्श शिक्षक स्मृतिषेश तुळशीराम गुरनुले यांच्या द्वितीय स्मृतिदिनी नोटबुक व पेन वितरण.

व्याहाड बुज.येथील आदर्श शिक्षक स्मृतिषेश तुळशीराम गुरनुले यांच्या द्वितीय स्मृतिदिनी नोटबुक व पेन वितरण.    


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील व्याहाड बुज.येथे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष श्री तुळशीराम भिवाजी गुरनुले यांच्या द्वितीय स्मृतिदिनी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन तर शिक्षक वृदांना  पुस्तकाचे वितरण गुरनुले परिवारातर्फे करण्यात आले.

सावली तालुक्यातील व्याहाड बुज.या लहानशा गावात गरीब घराण्यात जन्म घेऊन गरिबीचे चटके सहन करीत शिक्षण घेऊन जिल्हा परिषद शाळेत शिक्षक या पदावर कार्यरत होऊन कालांतराने मुख्याध्यापक पदावर कार्य करीत असताना जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव होणारे श्री तुळशीराम गुरनुले यांचे 21 सप्टेंबर 2021 रोजी देहावसान झाले होते.

त्यांच्या स्मृतिदिनी दिनांक 21 सप्टेंबर रोजी व्याहाड बुज. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे  शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन चे  तर शिक्षक वृंदांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज,क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावरील पुस्तके भेट देण्यात आले .

        

सदर कार्यक्रमात स्मृतीशेष तुळशीराम गुरनुले यांच्या जीवनावर श्री,माधव गुरनुले सर,धानोरकर सर,सुनील बोमनवार यांनी प्रकाश टाकला.या कार्यक्रमाला चंद्रपूर येथील पांडुरंग गावतुरे प्रा.एस.बी.पटले,प्रा.अरुण धानोरकर,माजी सरपंच,वंदना गुरनुले,माजी उपसरपंच, सुनील बोमनवार,पत्रकार,नासिर अन्सारी,पत्रकार, ज्ञानेश्वर सिडाम,जयंत संगीतवार,मेहबूब पठाण,माजी उपसरपंच संजय चांदेकर,दीपक गद्देवार,स्वप्नील बोमनवार,नागोबा गुरनुले,प्रकाश गुरनुले,महादेव लेनगुरे,नीलकंठ गुरनुले,अतुल गुरनुले उपस्थित होते,या कार्यक्रमाचे संचालन,अनिल गुरनुले यांनी केले. 


सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. माधव गुरनुले , अनिल गुरनुले,संजय गुरनुले यांचे तर्फे नियोजन करण्यात आले होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !